जयंत पाटलांच्या सांगण्यावरूनच कालवा समितीची बैठक घेतली : अजित पवार

या बैठकीत पुण्यासह विभागातील रेंगाळलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. गेल्या काही महिन्यात अनेक प्रकल्प रेंगाळले आहेत. हे सर्व प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी अडचणी दूर करण्याची गरज आहे. या सर्व अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजनांची माहिती घेतली. दहा वर्षे पालकमंत्री म्हणून काम केल्याने पुणे शहर व जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासंदर्भातील अडचणी मला माहित आहेत.
जयंत पाटलांच्या सांगण्यावरूनच कालवा समितीची बैठक घेतली : अजित पवार

पुणे : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितल्यावरून जलसंपदा विभागाची बैठक आज मी घेतली. विभागातील रेंगावळेल्या विविध प्रकल्पांची कामाचा आढावा घेतला, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिली. मात्र, मंत्री नसलेल्या, सरकारमधील कोणतीही जबाबदारी नसलेल्या अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक पूर्णत: बेकायदेशीर, असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. 

पुण्यात होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार का ? असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, आज अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालीच बैठक झाल्याने त्यावर विरोधकांकडून टीका सुरू झाली आहे. या संदर्भात बैठकीनंतर पवार यांनीच खुलासा केला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितल्यानुसारच अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. 

या बैठकीत पुण्यासह विभागातील रेंगाळलेल्या प्रकल्पांचा आढावा घेतला. गेल्या काही महिन्यात अनेक प्रकल्प रेंगाळले आहेत. हे सर्व प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी अडचणी दूर करण्याची गरज आहे. या सर्व अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजनांची माहिती घेतली. दहा वर्षे पालकमंत्री म्हणून काम केल्याने पुणे शहर व जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासंदर्भातील अडचणी मला माहित आहेत. या सर्व अडचणींवर लवकरच मार्ग काढण्याचे प्रयत्न केले जातील, असे पवार यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com