... तर अमली पदार्थ विकणाऱ्यांना फासावर लटकवा : अजित पवार

अमली पदार्थामुळे तरूण पिढी बरबाद होत आहे. कॉलेज असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे आपला 11वी, 12वी ला असणारा मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते? हे कळत नाही. आता मुंबई, ठाणे, नागपूर हे शहर वगळता इतर महाराष्ट्रात देखील अमली पदार्थ घेण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर जर रोख लावायचा असेल तर अमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.
... तर अमली पदार्थ विकणाऱ्यांना फासावर लटकवा : अजित पवार

मुंबई : अमली पदार्थामुळे तरूण पिढी बरबाद होत आहे. कॉलेज असणाऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ विकण्याचे प्रकार वाढले आहेत. आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे आपला 11वी, 12वी ला असणारा मुलगा किंवा मुलगी बाहेर काय करते? हे कळत नाही. आता मुंबई, ठाणे, नागपूर हे शहर वगळता इतर महाराष्ट्रात देखील अमली पदार्थ घेण्याचे प्रकार वाढले आहेत. यावर जर रोख लावायचा असेल तर अमली पदार्थ विकणाऱ्यांना थेट फाशी देण्याचा कायदा करा, अशी आक्रमक मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली.

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात अमली पदार्थांची कुरिअर आणि पोस्टमार्फत विक्री होत असल्याची लक्षवेधी आज विधानसभेत उपस्थित केली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना गृह राज्यमंत्री रणजीत पाटील म्हणाले की, अमली पदार्थांची विक्री रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा करू तसेच मुंबई शहरात स्थापन केलेला स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष प्रत्येक जिल्ह्यात स्थापन करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिले. 

अमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्याकरीता मुंबईत पाच स्वतंत्र कक्ष काम करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या कक्षांना मनुष्यबळ आणि निधीची आवश्‍यकता आहे, तो निधी वाढवून देण्यासाठी शासनस्तरावर आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही पाटील म्हणाले.

भाजपच्या आमदार मनिषा चौधरी यांनी अमली पदार्थांची 'खिशातली दुकाने' याकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. आता अमली पदार्थ रस्त्यावरील अनधिकृत पानटपऱ्या आणि शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विकले जात आहेत. तसेच जनरल स्टोअर्सचे परवाने रद्द करून काहीही होणार नाही, ही खिशातली दुकाने बंद करा, असे अजित पवार म्हणाले. 

यावर उत्तर देताना रणजीत पाटील यांनी सांगितले की, अमली पदार्थांची विक्री करणाऱ्याला आता 10 ऐवजी 20 वर्षांची शिक्षा दिली जात आहे. पुर्वी मॅजिस्ट्रेट समोर या केसेस चालत होत्या. आता जलदगतीने चालाव्यात यासाठी त्या सेशन कोर्टात चालविण्यात येत आहेत. कॉलेज कॅम्पसमध्ये साध्या वेषात पोलिसांची गस्त वाढविण्यासाठी मनुष्यबळ वाढविले जाईल.

मानखुर्द, गोवंडी परिसरात अमली पदार्थ विक्रेत्यांनी थैमान घातलेले आहे. या भागात अनेक अल्पवयीन मुले अमली पदार्थांच्या आहारी गेलेले आहेत. त्यांची तक्रार केल्यास ते स्वतःला मारून घेतात आणि पोलिसांत उलट तक्रार दाखल करतात. ज्याप्रकारे अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास त्याच्या पालकांना जबाबदार ठरविण्यात येते, त्याप्रमाणे अल्पवयीन मुलाने अमली पदार्थ सेवन केल्यास त्याच्या पालकांना दोषी ठरविण्यात येणारा कायदा करावा, अशी अजब मागणी अबू आजमी यांनी केली. 

या लक्षवेधी दरम्यान अजित पवार, भाजपच्या मनिषा चौधरी, कॉंग्रेसचे भारत भालके आणि समाजवादी पार्टीचे अबु आजमी यांनी प्रश्न विचारले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com