इंदापूरच्या शिवस्वराज्य यात्रेकडे अजित पवारांची पाठ...

इंदापूरच्या शिवस्वराज्य यात्रेकडे अजित पवारांची पाठ...

वालचंदनगर : राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या इंदापूर तालुक्यातील शिवस्वराज्य यात्रेकडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली.

शिवस्वराज्य यात्रेमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भाषणाकडे इंदापूर तालुक्‍यासह पुणे जिल्हाचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी अजित पवार यांना  येण्यास उशीरा लागणार असल्याचे सांगितले होते. मात्र पवार यांनी इंदापूरकडेच्या यात्रेकडे पाठ फिरवली. तसेच खासदार सुप्रिया सुळे ही यात्रेमध्ये सहभागी झाल्या नाहीत.

प्रास्ताविकामध्ये गारटकर यांनी २० वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांकडून इंदापूर तालुक्याची प्रगती झाली नसल्याचे सांगून माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावून  राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या माध्यमातून पाच वर्षात तालुक्याचा विकास होत असल्याचे सांगून इंदापूरची जागा राष्ट्रवादीकडे ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. यात्रेमध्ये खासदार अमोल कोल्हे,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सहभागी झाले होते.

इंदापूर तालुक्यातून राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रेय भरणे व कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील ही इच्छुक आहेत.   राज्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्षाची आघाडी झाल्यास इंदापूरच्या जागेचा पेच निर्माण होणार आहे. गेल्या वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये झालेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंथुर्णेमधील शेतकरी मेळाव्यामध्ये वाटेल ते झाले तरी इंदापूरची जागा राष्ट्रवादीची जागा सोडली जाणार नाही... भले आघाडी नाही झाली तरी बेहतर...असे वक्तव्य केले होते. याचे पडसाद राज्यामध्ये उमटले. यानंतर कळसच्या सभेमध्ये अजित पवार यांनी इंदापूच्या जागेसंदर्भात निर्णय शरद पवार साहेब घेणार असल्याचे सांगून इंदापूरच्या जागेचा चेंडू पवारसाहेबांच्या कोर्टात ढकलला.

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी व  कॉग्रेसचे आघाडी झाली. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह तालुक्यातील कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचे काम केल्याने  खासदार सुप्रिया सुळे यांना ७० हजारपेक्षा जास्त मताधिक्य मिळाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com