भाजपचे लोक अंदाज व्यक्त करतात आणि तितक्याच जागा ते जिंकतात, हे अजब : अजितदादा

भाजपचे लोक अंदाज व्यक्त करतात आणि तितक्याच जागा ते जिंकतात, हे अजब : अजितदादा

मुंबई :  महाराष्ट्राच्या निवडणुकांकडेही देशाचं वेगळं लक्ष असतं. या निवडणुकांना सामोरं जात असताना लोकांच्या मनात ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत शंका आहे.आमचा कुणावरही अविश्वास नाही, परंतु निवडणुका पारदर्शकच झाल्या पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. 

इव्हीएम विरोधात आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते पवार यांनी ईव्हीएमबाबत पक्षाच्यावतीने मत मांडले. या वेळी मनसेप्रमुख राज ठाकरे, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, कपिल पाटील, राजू शेट्टी आदी उपस्थित होते.  मागच्या काळात अनेक स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा अशाप्रकारची मागणी केली होती. अनेक प्रगत देशांमध्ये ईव्हीएमच्या वापरावर बंदी आहे. त्यामुळे बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, ही कुण्या एका राजकीय पक्षाची नव्हे! संपूर्ण जनतेची मागणी म्हणून ती पुढे यावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही  पवार यांनी सांगितले. 

त्यात हे लोक अंदाज व्यक्त करतात आणि तितक्या जागा येतात हे अजब आहे, असे आश्चर्य व्यक्त केले.आता देशात संभ्रमाचे वातावण निर्माण झाले आहेत. त्यामुळे निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

``अनेकांनी ईव्हीएम मशीनवर होणाऱ्या निवडणूकांवर अविश्वास व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांचे आभार मानले पाहिजे. त्यांनी हा लढा सुरू केला आहे. या लढ्यात सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.अमेरिका, जपान यांनी हे तंत्रज्ञान फेकून दिले आहे तरीदेखील आपल्याला हे का हवे आहे, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला. निवडणुकीवर सगळ्यांचा विश्वास बसला पाहिजे. यासाठी सरकारला गदगदा हलवण्याची गरज आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com