अजित पवार यांची प्रवीण दरेकरांवर सहज मात

ajit pawar
ajit pawar

पुणे : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार आणि मुंबै बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांना मात देत महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स काॅर्पोरेशनवर राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस आघाडीच वर्चस्व कायम ठेवले आहे. दोन्ही काॅंग्रेसच्या आघाडीला २१ पैकी १६ जागा मिळाल्या. भाजपला पाच जागांवर समाधान मानावे लागले.

राज्यातील सहकारी संस्थांत भाजपची ताकद वाढविण्याच्या कामात दरेकर यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते. राज्य सहकार संघाच्या निवडणुकीत त्यांना यश आले. मात्र हाऊसिंग फायनान्सवर त्यांची लढत थेट अजित पवार यांच्या प्रगती पॅनेलशी झाली. त्यात दरेकरांच्या सहकार पॅनेलला पराभव स्वीकारावा लागला.

या संस्थेच्या संचालक मंडळात आमदार माधनराव सानप (भाजप, नाशिक विभाग)), आमदार सतिश पाटील (राष्ट्रवादी, नाशिक विभाग), माजी आमदार वसंत गिते (भाजप, नाशिक विभाग) जयश्री मदन पाटील (सांगली) या दिग्गजांचा समावेश झाला आहे. या संस्थेचे राज्यात १७०० मतदार आहेत. संचालकपदासाठी १ जुलै रोजी मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज पार पडली. २१ पैकी पाच जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. संस्थेचे मावळते अध्यक्ष रवींद्र गायगोले (अमरावती) आणि उपाध्यक्ष योगेश पारवेकर (यवतमाळ) यांनी भाजपच्या पॅनेलमधून उमेदवारी घेतली होती. मात्र दोघांचाही पराभव झाला.

व्ही. व्ही पाटील (कोल्हापूर), वसंत घुईखेडकर (ओबीसी प्रवर्ग, यवतमाळ), महेश भांडेकर (चंद्रपूर), राकेश पन्नासे (नागपूर), जयसिंह पंडित (आमदार अमरसिंह पंडित यांचे बंधू), दिलीप चव्हाण,  सुनील जाधव, हरिहरराव भोसीकर (सर्व औरंगाबाद विभाग),  विजय पाटील, ललित चव्हाण (सातारा), सागर काकडे (पुणे), शैलजा लोटके (महिला प्रवर्ग, नगर), दीपक कोरपे (अमरावती), अजय पाटील (अमरावती), , सीताराम राणे (मुंबई), दत्तात्रेय वडेर (मुंबई), विजय पाटील (भटक्या विमुक्त प्रवर्ग),  उत्तमराव शिंदे (एससी-एसटी प्रवर्ग, औरंगाबाद) आदी प्रमुख उमेदवार विजयी झाले आहेत. 

राष्ट्रवादीच्या पॅनेलचे प्रचार प्रमुख अंकुश काकडे यांनी याबाबत सांगितले की ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. भाजपला काही जागा सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र दरेकर यांनी अव्वाच्या सव्वा मागणी केल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही. भाजपने सरकारी यंत्रणेचा दुरूपयोग करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. मात्र मतदारांनी दोन्ही काॅंग्रेसवर विश्वास टाकला.    

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com