सरकारचे डोके फिरलय का : अजित पवार

सरकारचे डोके फिरलय का : अजित पवार

जामखेड : विरोधक दिसत नाहीत, मग मोदींच्या दहा, अमित शहांच्या वीस, मुख्यमंत्र्यांना शंभर सभा का घ्याव्या लागतात, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विचारला.

हे सरकार शेतकरीविरोधी आहे. त्यांना पायउतार करण्याची हीच वेळ आहे. हे शेतकऱ्यांना निम्मे कर्ज भरायला सांगतात. पैसे असते तर त्यांनी कर्ज कशाला थकवले असते? सरकारला थोडं तरी डोकं आहे का? त्यांचं डोकं फिरलंय का,' अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारार्थ खर्डा येथे रविवारी झालेल्या सभेत विचारला.

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, "राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, विजयसिंह गोलेकर, प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रेय वारे, सूर्यकांत मोरे, राजेंद्र कोठारी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार म्हणाले, ""तुम्ही अगोदरच्या आमदारांची कामे पाहिली. आता या पवारांच्या पठ्ठ्याचे काम बघा. आम्ही बारामतीत करून दाखवलंय म्हणून बोलतो. मी आरेला कारे म्हणणारा कार्यकर्ता आहे. कोणी आमच्या कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा.''

रोहित पवार म्हणाले, ""मुख्यमंत्री मला जाहीर सभेत पार्सल म्हणतात. मग तुम्ही ज्यांना बारामती, पुण्यात उभं केलंय, त्या पार्सलांचं काय करायचं? राम शिंदे म्हणतात, ही निवडणूक खूप सोपी आहे. मग तुम्हाला एवढे मोठे नेते सभांसाठी कशाला लागतात? विकासकामे केली नाही. विकास केला फक्त ठेकेदारांचा. त्यांच्याकडे आता फॉर्च्युनर आहेत. हे मतदारांना सगळे समजते आहे. आधी म्हणायचे शिकार करणार, आता गेम करू. तुमचं काय करायचं ते लोकांनी ठरवलं आहे.''

प्रवेश करताच पक्षाने दिली जबाबदारी
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. बापूराव चव्हाण यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांची "राष्ट्रवादी'च्या जिल्हा प्रवक्तेपदी निवड केल्याचे राजेंद्र फाळके यांनी जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com