दहावी शिकलेल्या मंत्र्याकडं 'आयटी' खातं- राज्यमंत्री रविंद्र चव्हाणांवर अजित पवारांनी डागली तोफ

डोंबिवलीचे रविंद्र चव्हाण हे दहावी शिकलेले आहेत, त्यांच्याकडं त्यांच्याकडे आरोग्य आणि 'इंफर्मेशन टेकनॉलॉजी' हे पद दिलं आहे, हे खाते शिकलेल्या व्यक्तीकडे द्यायला पाहिजे अशी टीका अजित पवार यांनी चव्हाण यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन केली.बेरोजगारांना देण्यास नोकर्‍या नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी माफीला द्यायला पैसे नाहीत परंतु बुलेट ट्रेनला द्यायला यांच्याकडे पैसे आहेत. आधी इथल्या समस्या सोडवा नको ती सोंगं करु नका, असेही पवार यांनी सरकारला उद्देशून सुनावले.
दहावी शिकलेल्या मंत्र्याकडं 'आयटी' खातं- राज्यमंत्री रविंद्र चव्हाणांवर अजित पवारांनी डागली तोफ

कल्याण : डोंबिवलीचे रविंद्र चव्हाण हे दहावी शिकलेले आहेत, त्यांच्याकडं त्यांच्याकडे आरोग्य आणि 'इंफर्मेशन टेकनॉलॉजी' हे पद दिलं आहे, हे खाते शिकलेल्या व्यक्तीकडे द्यायला पाहिजे अशी टीका अजित पवार यांनी चव्हाण यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन केली. बेरोजगारांना देण्यास नोकर्‍या नाहीत. शेतकऱ्यांना कर्जमाफी माफीला द्यायला पैसे नाहीत परंतु बुलेट ट्रेनला द्यायला यांच्याकडे पैसे आहेत. आधी इथल्या समस्या सोडवा नको ती सोंगं करु नका, असेही पवार यांनी सरकारला उद्देशून सुनावले. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा आजचा पाचवा दिवस होता. यावेळी झालेल्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी नेते उपस्थित होते. 

"बुलेट ट्रेन आणून हे सरकार मयताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे काम करत आहे असा आरोप करतानाच या बुलेट ट्रेनची काय आवश्यकता अशी विचारणा ही अजितदादा पवार यांनी सरकारला केली. शहरात पाणी, रस्ते, सबवे, स्कायवॉक, मेट्रो यासारख्या व्यवस्था हव्यात परंतु यांनी कल्याण शहराला काय दिलं. वाढत्या प्रदूषणामुळे कल्याणचं वातावरण दुषित झालं आहे. हे शहर दुषित हवेनं गुदमरतंय. काय चाललंय या सरकारचं...कुठाय इथे स्वच्छ भारत अभियान...काय उपयोग याचा असे सवालही अजित पवार यांनी सरकारला केले," 

वाढत्या महागाईमुळे जगणं मुश्किल झाले आहे. ग्राहक आणि शेतकरी समाधानी नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांला आम्ही अडचणीत येवू दिले नाही. त्यांना कर्जमाफी दिली, अडचणीला धावून गेलो परंतु हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे असा आरोपही अजित पवार यांनी केला.

ते पुढे म्हणाले, ''एमआयएमला भाजपाने मतांचे विभाजन करण्यासाठी प्रोत्साहीत केले अशी माहिती भाजपमधील मंत्री रामदास आठवले देत आहेत असं राजकारण सुरु आहे. एक मारल्यासारखं करतंय आणि दुसरं रडल्यासारखं करतंय. गेल्या पाच वर्षांत युतीबाबत राजकीय चर्चा काय सुरु आहे. युती गेली खड्ड्यात म्हणतात. अरे जनता काय दुधखुळी आहे का? कशाला जनतेला फसवता,"

बेस्टचा संप का मिटवत नाही, मुंबईकरांचे हाल का करताय, असा सवाल करुन अजित पवार म्हणाले की, नेतृत्वात ताकद असली पाहिजे, निर्णय घेण्याची धमक असली पाहिजे. अहो एक दिवस समजू शकतो सात दिवस झाले संपाला, परंतू, अजून निर्णय नाही हे काय चालले आहे, असा सवाल त्यांनी केला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com