बोफोर्सवर बोंबलणारे, राफेलवर गप्प - अजित पवार

राजीव गांधी यांच्या काळात बोफोर्स तोफ घोटाळ्यावर बोंबलणारे आता राफेलवर गप्प आहेत. ज्या बोफोर्स तोफेवरून तेव्हा भाजपच्या लोकांनी युपीए सरकारवर आरोप केले होते, त्याच बोफोर्स तोफांच्या जोरावर यांच्या सरकारने कारगिलचे युध्द जिंकले होते - अजित पवार
बोफोर्सवर बोंबलणारे, राफेलवर गप्प - अजित पवार

औरंगाबाद : ''देशात अनेक लाटा येत असतात आणि जात असतात. इंदिरा गांधी, राजीव गांधी, जनता पक्ष आणि 2014 मध्ये मोदी लाट आली. तेव्हा मोदी मोदी म्हणणारे अच्छे दिनला भुलले, तेच आता वाईट दिवस आल्याचे म्हणत आहेत,'' असा टोला माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस बुथ कमिटी सक्षमीकरण संकल्प मेळाव्यात बोलतांना लगावला. 

अजित पवार म्हणाले, ''नाकर्ते, फेकू आणि खोटे बोलणारे हे सरकार आहे. बॅंकाचा कोट्यावधींचा पैसा घेऊन आधी मल्या पळाला, नंतर ललित मोदी, मेहुल चोकसी आणि आता आणखी कोणीतरी साडेपाच हजार कोटी रुपये घेऊन पळून गेला. त्या मल्याच या सरकारने केस तरी वाकडा केला? बर हे पळून जाणारे सगळे गुजरातचेच कसे? आता आजारी बॅंकाचे सशक्त बॅंकामध्ये विलीणीकरणाचा सपाटा केंद्र सरकारने लावला आहे. त्यामुळे ज्या बॅंका बुडाल्या त्या तर बुडाल्याच पण चांगल्या बॅंका देखील सलाईनवर आहेत. विकासाच्या नुसत्या गप्पा सरकार मारतयं. पण उद्योगपतींचा सरकारवरचा विश्‍वासच उडाला आहे. या मराठवाड्यात गेल्या चार वर्षात एकतरी मोठा उद्योग आला का?" 

ते पुढे म्हणाले, "केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असतांना सर्वाधिक 20 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अगदी मंत्रालयात जाऊन शेतकरी आत्महत्या करायला लागले आहेत. मंत्रालय आत्महत्यालय आणि भष्ट्राचाराचे केंद्र बनले आहे. या सरकारमधील 20-22 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आणि सरकारला दिले. पण एकटे खडसे सोडले तर मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनाच क्‍लीनचीट देऊन टाकली. त्यामुळे अधिकारी मस्तवाल झाले आहेत, सरकारचा त्यांना धाक राहिलेला नाही." पोलीस मार खातायेत मग राज्य कसे चालणार? भ्रष्टाचार तर कमी झालाच नाही, पण राज्यात लॅंन्ड, वाळू आणि भंगार माफिया निर्माण झाल्याचा आरोप देखील अजित पवार यांनी भाषणात केला. 

राफेल विमान खरेदी घोटाळ्यावर मौन धारण केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अजित पवार यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, "राजीव गांधी यांच्या काळात बोफोर्स तोफ घोटाळ्यावर बोंबलणारे आता राफेलवर गप्प आहेत. ज्या बोफोर्स तोफेवरून तेव्हा भाजपच्या लोकांनी युपीए सरकारवर आरोप केले होते, त्याच बोफोर्स तोफांच्या जोरावर यांच्या सरकारने कारगिलचे युध्द जिंकले होते." 2008 मध्ये केंद्रातील आघाडी सरकारच्या काळात राफेल विमान खरेदीचा व्यवहार झाला, तेव्हा विमानाची किंमत 526 कोटी रुपये ठरली होती. मोदी सरकार आल्यानंतर ती 1670 कोटी म्हणजे तीनपट कशी झाली असा सवाल देखील अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com