`फडणविसांना दिल्लीत पाठविण्यासाठी 288 आमदार ठराव करतील.. मुनगंटिवार खूष होतील`

...
devendra-fadanvis
devendra-fadanvis

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावून सांगण्यासाठी पुस्तक लिहिले आहे. ते चांगले साहित्यिक आहेत. त्यांच्या अभ्यासाचा गौरव म्हणून आम्ही सर्व 288 आमदार त्यांना दिल्लीत पाठविण्यासाठी ठराव करू. म्हणजे आम्हाला `सुगीचे दिवस` येतील. माजी राज्यपाल राम नाईक यांनी त्यासाठी जरा दिल्लीत बोलावे, अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीस हे दिल्लीत गेले तर सुधीर मुनगंटिवार अधिक खूष होतील, असा चिमटाही काढला.

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी लिहिलेल्या `सोप्या भाषेत अर्थसंकल्प` या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोल, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह बहुतांश नेते उपस्थित होते.

अजित पवार यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये भाषण केले. ते म्हणाले, ``सहा वर्षांपूर्वींचा प्रसंग मला आजही आठवतोय. मी तेव्हा अर्थसंकल्प मांडत असताना तेव्हा भाजपची मंडळी गोंधळ घालत होते. त्या वेळी एक आमदार मात्र कानात स्पीकर ठेवून माझे भाषण शांतपणे ऐकत होते. ते सदस्य म्हणजे देवेंद्र फडणवीस होते.`` अर्थमंत्र्यांचे भाषण शांतपणे ऐकावे, अशी टीप या पुस्तकाल लिहिली आहे, असे म्हणत त्यांनी भाजपच्या मंडळींना टोला मारला.

फडणवीस म्हणाले की या वेळी जनसामान्यांसाठी हे पुस्तक लिहिले आहे. आमदारांनाही त्याचा चांगला उपयोग होईल. अर्थसंकल्पातील किचकट व्याख्या समजावून सांगण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com