अजित पवार म्हणतात....कमी मार्क मिळवणारा व्यवहारात हुशार असतो, त्यावर तो पुढे जातो!

अजित पवार यांचा बेधडक स्वभाव अन्‌ स्पष्टवक्तेपणा सबंध महाराष्ट्राने पाहिला आहे. नाशिकला शासकीय आढावा बैठकीचा समारोप करतांना त्यांनीएक वाक्य असे उच्चारले की ज्याने बैठकीत बराचवेळ हशा पसरला होता
Ajit Pawar Cracked joke at Nashik Meeting
Ajit Pawar Cracked joke at Nashik Meeting

नाशिक : अजित पवार यांचा बेधडक स्वभाव अन्‌ स्पष्टवक्तेपणा सबंध महाराष्ट्राने पाहिला आहे. नाशिकला शासकीय आढावा बैठकीचा समारोप करतांना त्यांनी "कमी मार्क मिळवणारा व्यवहारात हुशार असतो. त्यावर तो पुढे जातो'' असे विधान केले. बैठकीत त्यांनी जाता जाता उपस्थितांच्या प्रश्‍नावर सहजच असाच सिक्‍सर मारला. मात्र तो उपस्थितांना एव्हढा भावला की अजित पवारांनी बराच वेळ तुफान हशा अन्‌ टाळ्या मिळवल्या.

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकला आढावा बैठकीसाठी आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची बैठ झाली. मात्र दिवसभराचा त्यांचा कार्यक्रम दमछाक करणारा होता. त्यातील एकही वेळ त्यांनी चुकू दिली नाही. दिंडोरी तालुक्‍यातील ग्रामपंचायत कार्यालयाच्या उद्‌घाटनासाठी ते भल्या सकाळी साडे सातलाच चक्क अर्धा तास आधी पोहोचले. ते पोहोचले तेव्हा कार्यक्रमाची ठिकाणी बरेच ग्रामपंचायत सदस्य देखील आले नव्हते. येथील दोन्ही कार्यक्रम वेळेत करत ते शासकीय बैठकीसाठी अगदी वेळेत पोहोचले. 

ही बैठक अनेक विषय व लोकप्रतिनिधी असल्याने अशीच रेंगाळली. मात्र, त्यांनी नेमकेपणाने विषय घेऊन ती देखील वेळेत तीनला संपवली. शेवटी शेवटी काही उपस्थितांनी विकासकामांचा व ते हाताळणाऱ्यांचा विषय काढला. उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या फाईलची लेस बांधत "कमी मार्क मिळवणारा व्यवहारात हुशार असतो. त्यावर तो पुढे जातो. जास्त मार्क मिळवणारा नुसता डोक्‍यानीच जास्त असतो. तो व्यवहारात कमी असतो.'' असे सांगत बैठक संपवली. त्यावर उपस्थितांत हशा उसळला. कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला. त्यांच्या या वाक्‍याने बैठकीतील ताण क्षणात नाहीसा झाला. बैठक संपल्यावर देखील त्यांचे हे वाक्‍यच चर्चेचा विषय ठरले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com