स्वतःच्या पुणे जिल्ह्यात अजित पवार एकाकी : एकही आमदार पाठीशी नाही

...
स्वतःच्या पुणे जिल्ह्यात अजित पवार एकाकी : एकही आमदार पाठीशी नाही

पुणे : पुणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागातील केवळ अजित पवार यांचा अपवाद वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊपैकी आठ आमदार पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

या आठही आमदारांनी शनिवारी दुपारी (ता. २३) शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीला उपस्थिती लावली. यामुळे बंडखोरी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे अजित पवार हे एकाकी पडले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी अजित पवार यांची पक्षाच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. शिवाय पक्षाच्या आमदारांना व्हिप जारी करण्याचा अधिकारही काढून घेण्यात आला आहे.

पक्षाच्या पाठिशी उभे राहिलेल्यांमध्ये  आंबेगावचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील, शिरुरचे आमदार अशोक पवार, इंदापूरचे दत्तात्रेय भरणे, जुन्नरचे अतुल बेनके, मावळचे सुनील शेळके, हडपसरचे चेतन तुपे आणि वडगाव शेरीतील सुनील टिंगरे यांचा समावेश आहे.       राष्ट्रवादी काँग्रेसच्या  नवनिर्वाचित आमदारांची शनिवारी दुपारी यशवंतराव चव्हाण भवनात पवार यांनी बैठक घेतली.

पुण्यातील काही आमदार हे अजितदादांचे कट्टर मानले जातात. मात्र त्यांनीही तातडीने अजितदादांच्या मागे उभे राहण्यास असमर्थता व्यक्त केली. सुनील शेळके हे तर अजितदादांच्या शपथविधीला हजर होते. मात्र नंतर ते शरद पवार यांना जाऊन भेटले.  

दरम्यान राष्ट्रवादीच्या एकून 54 आमदारांपैकी पाच आमदारांचा संपर्क होत नाही. स्वतः अजित पवार यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे 49 आमदार हे शरद पवार यांच्यासोबत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या पाच आमदारांना गुजरातमध्ये नेण्याचे आल्याचे सांगण्यात आले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com