#MaharashtraBudget2020- अजित पवारांनी 'या'साठी केले नितीन गडकरींचे अभिनंदन

राज्यातल्या रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरींचे विधानसभेच अभिनंदन केले
Ajit Pawar Congratulates Nitin Gadkary
Ajit Pawar Congratulates Nitin Gadkary

मुंबई : राज्यातल्या रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरींचे विधानसभेच अभिनंदन केले. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी राज्यातल्या वाहतुकीबाबत महाविकास आघाडीच्या सरकारची दिशा स्पष्ट केली. 

राज्यातल्या महाविकास आघाडीचे सरकार शंभर दिवस पूर्ण करण्याच्या मुहुर्तावर पवार यांनी आज विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला. त्यावेळी त्यांनी नितीन गडकरींचे अभिनंदन केले. राज्यातील वाहतुक सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनाही त्यांनी विधानसभेत मांडल्या.

ते म्हणाले, "ग्रामीण भागात बसमध्ये वायफाय सुरू करणार असून एसटीच्या १६०० जुन्या बस बदलण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या वेळेत बस सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. रेवस ते रेड्डी या सागरी महामार्ग काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. नागरी विकासासाठी मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांसाठी नागरी सडक योजना राबवण्यात येणार आहे. पुणे मेट्रोसाठी मागील पाच वर्षात जो निधी दिला त्याच्या पेक्षा जास्त निधी यावर्षी देण्यात येईल. राज्यात ८० हजार मिलिमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे होतील. सोलापूर, पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यात येईल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com