राष्ट्रवादीमध्येच असल्याचे अजितदादांनी पुन्हा ट्‌विटरवर लिहले! 

राष्ट्रवादीमध्येच असल्याचे अजितदादांनी पुन्हा ट्‌विटरवर लिहले! 

मुंबई : उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी आपले ट्‌विटर अकाउंटवरील पदाची ओळख बदलली असून 
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येच असल्याचं पुन्हा ट्‌विटरवर लिहले. याचाच अर्थ ते पुन्हा राष्ट्रवादीत सक्रिय होतील अशी चर्चाही होताना दिसत आहे. 

रा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याअगोदर अजितदादांनी भाजपने देऊ केलेले उपमुख्यमंत्रीपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील जनतेला पुन्हा एकदा धक्का बसला. अजितदादा हे काही वेळात राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

ते बैठकीला जातील का ? राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि आमदारांना भेटतील का ? हा जर तरचा प्रश्‍न असला तरी त्यांनी आज राजीनामा दिल्यानंतर स्वत:ची ओळख राष्ट्रवादीचे नेतेच असल्याचे स्पष्ट केले आहे. माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते असा उल्लेख त्यांच्या ट्‌विटर अकाउंटवर आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com