अजित पवारांचे मेव्हणे अमरसिंह पाटील यांचे निधन

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे धाकटे बंधू अमरसिंह बाजीराव पाटील ( वय 50) यांचे प्रदीर्घ आजाराने आज पहाटे पुण्यात निधन झाले
Ajit Pawar Brother in Law Amarsinh Patil Dies Due to Illness
Ajit Pawar Brother in Law Amarsinh Patil Dies Due to Illness

बारामती  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे व बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांचे धाकटे बंधू अमरसिंह बाजीराव पाटील ( वय 50) यांचे प्रदीर्घ आजाराने आज पहाटे पुण्यात निधन झाले. 

एक व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा परिचय होता. तेर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. शेती हा त्यांच्या आवडीचा विषय होता. काही काळ त्यांनी शेतीपुरक व्यवसाय देखील केला होता. त्यांचे वाचन दांडगे होते, एक व्यासंगी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आज दुपारी त्यांच्या मूळ गावी तेर (जि. उस्मानाबाद) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com