ajit pawar birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 22 जुलै 2018

..शब्दाला जागणारा नेता....

ठराविक गोष्टी पुढाऱ्यांना-यांनी करायलाच हव्यात असे काहीसे गणितच राज्याच्या राजकारणात ठरून गेलेले होते. मात्र या पलीकडे जाऊनही राजकारण व समाजकारण होऊ शकते आणि प्रदीर्घ काळ यशस्वी राजकारण होऊ शकते याचे एक अपवादात्मक उदाहरण म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाहावे लागेल. 

ज्येष्ठ नेते शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर त्यांनी अजित पवार यांना बारामतीचे आमदार म्हणून संधी दिली. अगदी सुरवातीपासूनच त्यांनी विकासाभिमुख राजकारण करायचे आणि थेट कार्यकर्त्यांशी नाळ जोडून ठेवायची हे त्यांच्या राजकारणाचे सूत्र ठेवले. 

राजकीय नेतृत्वाच्या आश्वासनाला किंवा शब्दाला मतदारांच्या लेखी फार किंमत कधीच नसते, बारामतीत नेमके याच्या उलटे आहे. अजित पवारांनी जर शब्द दिला तर ते तो पाळणारच याची या मतदारसंघातील मतदार व नेत्यांनाही पुरेपूर कल्पना असते, त्या मुळे त्यांचा शब्द मिळाला की काम झाले असे येथील समीकरण आहे. अजित पवारही शब्द देताना जपून देतात, जे काम आपण मार्गी लावू शकू अशी त्यांना खात्री असते त्या बाबतच ते जाहीरपणे बोलतात, अन्यथा त्याची वाच्यताही ते करीत नाहीत. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख