तिथे बोटी उलटून माणस मरतात आणि हे हसत सेल्फी  काढतात : अजित पवार  

पूरग्रस्त भागात तिथं बोटी उलटून माणस मरतात आणि हे तिथे सेल्फी काढून दात काढतात.
ajitdada_ pawar
ajitdada_ pawar

नागपूर :  एका हातात माईक आणि एका हातात डबा. "द्या हो द्या पैसे द्या', असे म्हणत काही लोक मुबईत फिरत  आहेत. ही काय मदत गोळा करण्याची रीत आहे काय? ते राज्यकर्ते आहेत, हे विसरले कदाचित,  या भाषेत अजित पवारांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंना टोला लगावला .  शिवस्वराज्य यात्रे दरम्यान यवतमाळ येथील सभेत ते बोलत होते. 

पूरग्रस्त भागात तिथं बोटी उलटून माणस मरतात आणि हे तिथे सेल्फी काढून दात काढतात. फडणवीस सरकारच्या काळात बेबंदशाही वाढली आहे. गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचा फटका तरुणींना, महिलांना  बसतो आहे. अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात वाढल्या आहेत.

सरकार आज अडचणीत आहे, सरकारकडे पैसे नाही, कर्जचा मोठा बोजा आहे. राज्य आर्थिक डबघाईला आले आहे आणि सरकार विविध घोषणा करत फिरत  आहे. अन्य घोषणांप्रमाणेच या घोषणाही फसव्या ठरणार.

यांच्या भूलथापांना बळी पडू नका. सरकारला कामकाज झेपत नाही. सरकारला खोटंनाटं बोलायची घाणेरडी सवय आहे. तिवऱ्यात धरण फुटले, अन मंत्री म्हणतात खेकड्याने धरण फोडले! धरण केवढे, खेकडा केवढा?  खोटं बोलायची काही सीमा आहे की नाही राव?  असेही ते म्हणाले. 

 ही  महा'धनादेश' यात्रा :  धनंजय मुंडे 
गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. या आदिवासी समाजाला विशिष्ट आरक्षण असते. मात्र, या फडणवीस सरकारने या आरक्षण कपात करण्याचा बेत आखला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आदिवासी समाजाला हे आरक्षण दिले.

आरक्षण कपात करणारे हे सरकार कोण, ही भारतीय घटनेची पायमल्ली आहे. कधी नव्हे ते शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून संप केला. तेव्हा कुठे कर्जमाफी झाली. हा अन्याय मोडून काढायचा असेल तर आघाडीचा आमदार पाठवा, तेव्हा तुमच्या अन्यायाला वाचा फोडता येईल, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com