ajit pawar and walase patil
ajit pawar and walase patil

अजितदादांनी वळसे पाटलांना विचारले, माझे काय चुकले?

...

मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मनधरणीचे दिवसभर प्रयत्न केले; परंतु अजित पवार अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे दोन्ही नेत्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

चुलत बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे, पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी आधीच सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवारांना माघारी फिरण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही अजित पवारांची भेट घेऊन आले. तिघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली; परंतु अजित पवार माघारी फिरण्याच्या मनःस्थितीत नाहीत. मी पक्षाच्या हितासाठीच भाजपसोबत गेल्याचे सांगत माझे काय चुकले, असा सवाल अजितदादांनी वळसे पाटलांना केल्याचे समजते.

अजित पवार यांनी बंड पुकारत भाजपशी हातमिळवणी केली आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षासोबतच पवार कुटुंबातही उभी फूट पडल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीकडून वारंवार त्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न होत आहेत. अजित पवार कालचा दिवस बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी थांबले होते. त्यांच्यासोबत पुत्र पार्थ पवारही होते.

त्यानंतर आज सकाळी दोघे मुंबईतील चर्चगेट येथील निवासस्थानी गेले. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर जमले होते. भाजपचे आमदार सुरेश धस, ऍड. आशिष शेलार, राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील माजी आमदार आणि आता भाजपवासी झालेले रामराव वडकुते यांनीदेखील आज अजित पवार यांची भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com