तुमच्याकडे नाराजी शोधायच यंत्र आहे का ? अजितदादांचा सवाल

अजित पवार म्हणाले, मी अजिबात नाराज नाही. आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील मिळून सहा आमदार शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत.
ajit_pawar
ajit_pawar

मुंबई :  अजित पवार नाराज आहेत, अशा बातम्या माध्यमांतून सातत्यांने दिल्या जात आहेत. आजही एका प्रतिनिधीने'आपण नाराज आहात, असे बोलले जात आहे, त्यावर आपण काय म्हणाल?' असा प्रश्‍न विचारला असता, "तुमच्याकडे नाराजी शोधण्याच यंत्र आहे का'', असा प्रतिप्रश्‍न अजित पवार यांनी केला.

अजित पवार म्हणाले, मी अजिबात नाराज नाही. आज मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील मिळून सहा आमदार शिवतीर्थावर शपथ घेणार आहेत. त्यानंतर विधानसबेत विश्‍वासदर्शक ठराव पारीत केला जाईल. या प्रक्रियेनंतर विधानसभा अध्यक्षांची निवड होईल आणि मग मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.

विस्तारामध्ये कुणाला मंत्री बनबायचे याचा निर्णय महाविकास आघाडीतील त्या-त्या पक्षांचे शिर्षस्थ नेते घेतील. शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी उद्धव ठाकरे, कॉंग्रेसची यादी सोनिया गांधी किंवा अहमद पटेल आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची यादी शरद पवार निश्‍चित करतील. उपमुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय शरद पवार तिन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करुन घेतील.

पण आपण भाजप बरोबर जाऊन उप मुख्यमंत्री पदाची शपथ का घेतली होती असे विचारले असता ते म्हणाले, या विषयावर मला जेंव्हा वाटेल तेंव्हा बोलेन .  या देशात व्यक्ती स्वातंत्र्य आहे . या विषयात आज मला बोलायचे नाही . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com