शिवजयंतीसाठी सरकारकडे पैसे मागता...मग तुम्ही काय कामाचे?

....
ajit-pawar-meeting-pune
ajit-pawar-meeting-pune

पुणे : शिवजयंतीसाठी तुम्ही सरकारकडे पैसे मागात असाल तर तुम्ही काय कामाचे?, अशा कानपिचक्या पालकमंत्री अजित पवार यांनी लोकप्रतिनिधींना दिल्या. मात्र शिवजयंती सोहळ्यासाठी स्थानिक स्वराज संस्थांनी 25 लाखांचा निधी देण्याचे आदेश दिले. यामध्ये जिल्हा परिषद, जुन्नर नगरपालीका, जुन्नर बाजार समिती, जिल्हा दूध संघ यांनी प्रत्येकी अनुक्रमे 10 लाख आणि 5 लाखांचा असा 25 लाखांचा निधी देण्याचे आदेश दिले.

पवार यांनी जिल्ह्यासह शहरातील विविध विकास प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. शिवनेरी विकास प्रकल्प आढावा आणि शिवजयंतीच्या नियोजन बैठकीसाठी खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीची माहिती देताना पवार म्हणाले, जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र विकासाठी भंडारा डोंगरासह आळंदी- देहूच्या विकासासाठीच्या 400 कोटींच्या प्रस्तावामध्ये आणखी निधी वाढविणार आहोत. तर आळंदी पढंरपूर पालखी मार्ग सहापदरी करण्याच्या कामाचा आढावा घेतला. या मार्गावर वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.

शिवनेरी रोप वे बाबत बोलताना पवा   म्हणाले याबाबत विविध विचार आहेत. रायगड रोप वे मुळे गडावर गेलेला पर्यटक त्याच रोप वे ने खाली येतो. तर शिवनेरीच्या माथ्यावर केवळ जन्मस्थान असून निम्मा किल्ला मध्यावर आहे. यामुळे पर्यटकांना चालतच खाली यावे लागणार आहे. यामुळे शिवनेरी रोप वे बाबत व्यवहार्य  प्रस्ताव करण्याच्या सुचना दिल्या आहेत. 

पुणे जिल्हा, शहर, पिंपरी चिंचवड या ठिकाणची विकासकामे गतीने होण्यासाठी आठवड्यातील पूर्ण एक दिवस देणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com