मुंबई : शिवसेनेकडून वेगळ्या भाषेची अपेक्षा ठेवता येणार नाही, त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा काय ठेवणार? विनाशकाले विपरीत बुद्धी अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी "सामना'च्या अग्रलेखावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे. शिवसेनेने "सामना'च्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन घाणेरड्या शब्दांत टीका केली आहे. त्यावर अजित पवार यांनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नियोजित अयोध्या दौऱ्यावरुन अजित पवार यांनी टीका केली होती. पाच वर्षांमध्ये बापाचं स्मारक बांधता आलं नाही ते राम मंदिर काय बांधणार ?, असा खोचक सवाल त्यांनी विचारला होता. शिवसेना आणि अजित पवार यांच्यात गेल्य काही दिवसापासून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. सामनाच्या अग्रलेखातून अजित पवारांवर टीकास्त्र सोडण्यात आले.
अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या छायाचित्रांच्या छंदाविषयी टोला लगावला होता. यावर उद्धव ठाकरेंनी काय प्रत्युत्तर दिले होते, याची आठवणही अग्रलेखात करुन देण्यात आली. "या महाशयांनी एकदा आमच्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका केली. पण आम्ही आमचे छंद उघडपणे लोकांसमोर जोपासू शकतो. आम्ही आमच्या पंढरीची वारी, शिवरायांचे गडकोट किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शनाचे जे छंद जोपासले आहेत ते उघडपणे करू शकतो. पण अजित पवार त्यांच्या छंदाचे प्रदर्शन उघडपणे करू शकतील का?
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.