अजित पवारांच्या गणितानुसार पुण्यातून तिसरा कोण ?

अजित पवारांच्या गणितानुसार पुण्यातून तिसरा कोण ?

पुणे : तीन आमदारांमागे एक मंत्रिपद या सूत्राप्रमाणे पुण्याला तीन मंत्रीपदे मिळायला हवीत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी चार दिवसांपूर्वी पुण्यात केली होती. पुढच्या चार दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. विस्तारात पुण्यातून अजित पवार व दिलीप वळसे-पाटील यांची नावे निश्‍चित मानली जात आहेत. पवार यांच्या मागणीप्रमाणे निर्णय झालाच तर तिसरा मंत्री कोण याची चर्चा सुरू झाली आहे. 

पवार आणि वळसे-पाटील यांच्याबरोबर तिसरे मंत्रीपद खरोखरच मिळाले तर ते राज्यमंत्रीपद असेल. या पदावर येऊ शकतील असे जिल्ह्यात एक-दोन आमदार आहेत. मात्र, जातीय समीकरणाचा प्रश्‍न असल्याने खरेच संधी मिळेल का याबाबत शंका आहे. दत्तात्रय भरणे,अशोक पवार यांची नावे घेता येतील. मात्र, जिल्ह्यात मंत्रीपदाची संधी एका विशिष्ट समाजाला द्यायची की इतर समाजाला सामावून घ्यायचे याचा विचार पक्ष पातळीवर होण्याची शक्‍यता आहे. राज्यात शिवसेनेची सत्ता आली असली तरी निवडणुकीत सेनेच्या हाती पुण्यातून भोपळा मिळाला आहे. त्यामुळे पुण्यातून सेनेकडून कुणाला संधी मिळण्याची शक्‍यता नाहीच. पुण्यात कॉग्रेसला पुरंदर व भोर या दोन जागा मिळाल्या आहेत. यापैकी पुरंदरमधून संजय जगताप यांची पहिलीच वेळ आहे. भोरमधून संग्राम थोपटे तिसऱ्यांदा निवडून आलेत. त्यामुळे पक्षाकडून त्यांना राज्यमंत्रीपद मिळू शकते. दोन दिवसात अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची गडबड सुरू होईल. या विस्तारात पुण्याला खरोखरीच किती संधी मिळणार याचे उत्तर मिळेल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com