हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी सरकारी जमीन देणार - अजित पवार 

""पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुणे शहर तसेच जिल्ह्यातून जलद पोचता येईल, अशा पद्धतीने रस्त्यांचे नियोजन करावे. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगी-शेवाळवाडी मेट्रोसाठी भूसंपादन तसेच अन्य बाबी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात'', असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.
हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी सरकारी जमीन देणार - अजित पवार 

मुंबई : हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्‍यक शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा आढावा तसेच पुणे मेट्रोच्या आढावा बैठकीत स्पष्ट केले. 
पवार म्हणाले, ""पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील 9 तालुक्‍यांचा समावेश असलेल्या "पीएमआरडीए'चे कार्य पुणे जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिका क्र. 3 साठी आवश्‍यक राज्य शासनाच्या मालकीची 15 हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल.'' 

""पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पुणे शहर तसेच जिल्ह्यातून जलद पोचता येईल, अशा पद्धतीने रस्त्यांचे नियोजन करावे. विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रस्तावित शिवाजीनगर-हडपसर-फुरसुंगी-शेवाळवाडी मेट्रोसाठी भूसंपादन तसेच अन्य बाबी लवकरात लवकर मार्गी लावाव्यात'', असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित या बैठकीस "पीएमआरडीए'चे आयुक्त विक्रम कुमार, मुख्य अभियंता विवेक खरवडकर, अतिरिक्त आयुक्त प्रवीणकुमार देवरे आदी अधिकारी उपस्थित होते. 

रिंगरोड, परवडणारी घरे आदींचा आढावा 
पवार यांनी बैठकीत "पीएमआरडीए'च्या प्रकल्पांसाठीचे आर्थिक नियोजन, मनुष्यबळ, उत्पन्नाचे स्रोत, "पीएमआरडीए'च्या माध्यमातून कामे सुरू असलेल्या रिंगरोड, रस्ते, मेट्रो मार्गिका, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प, नगररचना योजना, टाऊनशिप, इंद्रायणी नदीसुधार, प्राधिकरणाच्या हद्दीत पाणीपुरवठा आदी बाबींचा आढावा घेतला. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com