पालकमंत्रीपदावर दावा करणारे अजित पवार कालवा समितीच्या बैठकीला हजेरी लावणार का ?

 पालकमंत्रीपदावर दावा करणारे अजित पवार कालवा समितीच्या बैठकीला हजेरी लावणार का ?

पुणे : वर्षभर पुणेकरांना पुरेशा पाणी पुरवठ्याच्या निर्णयासाठी होणारी कालवा समितीची बैठक उद्या होणार आहे. ही बैठक बहुधा मुंबईत होण्याची शक्‍यता आहे. जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला पालकमंत्रीदेखील उपस्थित असतात. सध्या जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री आहेत. मात्र, पुण्याला पालकमंत्री नाहीत. त्यामुळे पालमंत्रीपदावर दावा करणारे अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

गेल्या आठवड्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या सभागृहात झालेल्या मेळाव्यात पवार यांनी आपणच पुण्याचे पालकमंत्री होणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री नसले तरी जिल्ह्यातील आमदार म्हणून पवार या बैठकीला उपस्थित राहणार का याची चर्चा सुरू झाली आहे. दरवर्षी ऑक्‍टोबर महिना संपल्यानंतर कालवा समितीची बैठक होते. या बैठकीत खडवासला धरण प्रकल्पातून पुणे शहराला तसेच जिल्ह्यातील शेतीसाठीच्या पाण्याचे नियोजन केले जाते. 1997 साली राज्य सरकारबरोबर महापालिकेचा करार झाला. या करारानुसार साडेअकरा "टीएमसी' पाणी पुण्याला देण्यात आले आहे. 

गेल्या बावीस वर्षात पुण्याची लोकसंख्या दुपटीहून अधिक वाढली आहे. साडेअकरा टीएमसीचा करार असला तरी 55 लाख लोकसंख्येच्या पुण्याला जवळपास 14 ते 15 टीएमसी पाणी वापरले जाते. या पुढील काळातील वाढती गरज लक्षात घेऊन पुण्यासाठी साडेसतरा " टीएमसी' पाण्याची मागणी महापालिकेकडून जलसंपदा विभागाकडे करण्यात आली आहे. इतके पाणी पुण्याला देण्याबाबत तसेच येत्या वर्षाच्या नियोजनाबाबत महत्वाची चर्चा या बैठकीत होणार आहे. त्यामुळे पुण्याचा पालकमंत्री होण्याचा मनोदय व्यक्त करणारे अजित पवार आमदार म्हणून जरी या बैठकीला उपस्थित राहिले तरी पुण्याची बाजू भक्कमपणे मांडताना जिल्ह्याच्या शेतीसाठीच्या पाण्याचाही विचार गांभीर्याने होईल हा या चर्चेचा सूर आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com