अजित पवार आणि जयंत पाटील विदर्भात करणार राष्ट्रवादीचा विस्तार

पश्‍चिम महाराष्ट्रवादी पार्टी हा ठपका पुसून काढण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भात विस्तार करण्याचे ठरविले आहे. याकरिता आपण जातीने लक्ष देणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार; तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूतोवाच केले. आज दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कॉंग्रेसची अचानक बैठक घेतली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
अजित पवार आणि जयंत पाटील विदर्भात करणार राष्ट्रवादीचा विस्तार

नागपूर : पश्‍चिम महाराष्ट्रवादी पार्टी हा ठपका पुसून काढण्यासाठी आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने विदर्भात विस्तार करण्याचे ठरविले आहे. याकरिता आपण जातीने लक्ष देणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार; तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सूतोवाच केले. आज दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा कॉंग्रेसची अचानक बैठक घेतली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

विदर्भातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा आमदार निवडून आले आहेत. याचा फायदा घेतला जाणार आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांनीदेखील राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. भाजपची सत्ता स्थापनेची धडपड सुरू असताना शरद पवार यांनी दोन दिवस पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे सांत्वन केले. जे कोणी काही कारणांमुळे पक्षापासून दुरावले त्यांनाही पुन्हा जोडण्यात येणार आहे. पवारांचे वारंवार होणारे दौरे बघता आता राष्ट्रवादीचे टार्गेट विदर्भ असल्याचे मानले जात आहे.

मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी राष्ट्रवादीची विदर्भात चांगली कामगिरी झाली आहे. अजित पवार स्वत: जातीने लक्ष घालणार आहेत. जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आढावा बैठकीत पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

महाआघाडी सरकारच्या आगामी धोरणांविषयीची माहिती कार्यकर्त्यांना देताना युती सरकारच्या कार्यकाळात घेतलेले शेतकरीविरोधी निर्णय रद्द करणार असून शेती समृद्धी व रोजगार निर्मितीवर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेशचंद्र बंग, मधुकर कुकडे, निरीक्षक धनंजय दलाल, शब्बीर विद्रोही, विजय घोडमारे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

शरद पवार कार्यकर्त्यांशी बोलणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देवगिरी येथे बुधवारी सकाळी 8.30 वाजता नागपूर जिल्ह्यासह संपूर्ण विदर्भातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com