आता अजित पवारांना क्‍लिन चिटदेखील मिळेल ; कॉंग्रेसची टीका

 आता अजित पवारांना क्‍लिन चिटदेखील मिळेल ; कॉंग्रेसची टीका

पुणे : विदर्भ विकास महामंडळाच्या नऊ प्रकरणातील फाईल पुरेशा पुराव्या अभावी बंद करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. हा निर्णय अजित पवार यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घेतला असून सरकार पवार यांना आज ना उद्या क्‍लिन चिट देईल, त्याचीच ही सुरवात आहे, अशी टीका कॉंग्रेसने केली आहे. 

राज्यातील पेटलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांना तातडीने दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेसह छोट्या पक्षांची महाविकास आघाडी एका बाजूला तर भारतीय जनता पार्टी एका बाजूला अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपाबरोबर संगनमत केल्याने राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. मात्र, बहुमताची सत्वपरीक्षा सरकारला अद्यापी द्यायची आहे. 

अजित पवार यांचे मन वळविण्याचे प्रयत्न राष्ट्रवादीकडून सातत्याने सुरू आहेत. या प्रयत्नांना अजित पवार यांच्याकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाही. गेल्या दोन दिवसात राष्ट्रवादीचे सारे महत्वाचे नेते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र, अजित पवार यांचे मन ते वळवू शकले नाहीत.या पार्श्‍वभूमीवर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने विदर्भ विकास महामंडळातील नऊ प्रकरणातील तपास पूर्ण केला आहे. या तपासात अजित पवार या प्रकरणाशी संबंधित आहेत या बाबतचे पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे या नऊ फाईल्स बंद करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com