ajit pawar and chandrakant patil | Sarkarnama

"चंपा' आणि "उठा' हे तर शॉर्टफॉर्म त्यात आक्षेपार्ह काय? : अजित पवार

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

मुंबई : चटकन नाव घ्यायला सोपे पडते म्हणून मी चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म "चंपा' केला आहे. त्यात आक्षेपार्ह असे काहीही नाही, असे अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

मुंबई : चटकन नाव घ्यायला सोपे पडते म्हणून मी चंद्रकांत पाटलांच्या नावाचा शॉर्टफॉर्म "चंपा' केला आहे. त्यात आक्षेपार्ह असे काहीही नाही, असे अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. 

यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नामकरण "उठा' असेही करून टाकले. चंद्रकांत पाटील हे पुण्यामध्ये येऊन आपले नेतृत्व प्रस्थापित करीत आहेत. म्हणून अस्वस्थ होऊन त्यांचा उल्लेख असा करीत आहात काय? असे विचारले असता श्री. अजित पवार म्हणाले, "" असे काहीही नाही. ते आता पुण्यात आलेले आहेत. लोक त्यांचे काम पाहतील. माझे काम पाहतील. अन्य नेत्यांचेही काम पाहतील आणि ठरवतील कोण चांगले आहे ते. इथे कोणी कोणाला थांबवत नसतो याप्रमाणे कोंबडं कितीही झाकून ठेवलं तरी ते पहाटे आरवतच. तसेच राजकीय नेतृत्वाचे असते. ज्याच्यात धमक आहे तो पुढे येतोच.'' 

उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, "" मी भावनिक झालो तेव्हा ते म्हणाले हे मगरीचे अश्रू आहेत. मी तरी राजकीय परिस्थितीमुळे भावनाशील झालो होतो. मी तर असे ऐकले आहे की परदेशातून आणलेले मासे मरण पावले म्हणून उद्धव ठाकरे रडले होते. दोन दिवस अस्वस्थ होते. चिडचिड करीत होते. मी त्यांचे नामकरण उठा असे करणार आहे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख