राजकारणात काट्‌यानेच काटा काढायचा असतो : अजित पवार

 राजकारणात काट्‌यानेच काटा काढायचा असतो : अजित पवार

मुंबई : पक्षातील नेत्यांच्या फोडाफोडीची सुरूवात त्यांनी केली. आता शेवट आम्ही करू असा इशारा देत राजकारणात काट्‌यानेच काटा काढायचा असतो. असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेना भाजपला लगावला आहे. भाजपचे माजी आमदार दौलत दरोडा आणि कॉंग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवार बोलत होते. 

भाजप शिवसेनेतील अनेक दिग्गज उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात असून, जे येतील त्यांचे स्वागत असल्याचे पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे आमदार पांडूरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शहापूर मतदारसंघातील माजी आमदार दौलत दरोडा यांनी आज राष्ट्रवादी मधे प्रवेश केला. तर, पंढरपूरची जागा राष्ट्रवादीकडे असल्याने भारत भालके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

राजकारणात काट्‌यानेच काटा काढायचा असतो असे म्हणताना अजित पवार म्हणाले की, इतर पक्षातील आमदारांना सत्ताधारी भाजप शिवसेनेने राजकीय अमिष दाखवून त्यांच्याकडे घेतले. त्यामुळे त्या त्या मतदारसंघातील भाजप शिवसेनेचे अनेक निष्ठावंत व ईच्छुक कार्यकर्ते नाराज झाले असून ते आमच्या संपर्कात आहेत. त्यांना योग्य वेळी पक्षात प्रवेश देवून उमेदवारी दिली जाईल. 

कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे जागावाटप पुर्ण झाले असून 2 ऑक्‍टोंबर या महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी आघाडीची अधिकृत घोषणा व उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल अशी माहीती अजित पवार यांनी दिली. बारामती विधानसभा मतदारसंघातून भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता बारामतीच्या जनतेनं आम्हाला कायम लाखाच्या मताधिक्‍याने विजयी केले आहे. त्यामुळे, विरोधी पक्षाचा उमेदवार कोणताही असला तरी त्याची काळजी नाही. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे सुरू असलेली गळती आजही कायम होती. कर्जत चे राष्ट्रवादीचे आमदार व सुनिल तटकरे यांचे निकटवर्तीय सुरेश लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com