भाजप -शिवसेनेला निवडणुकांवेळी राम आठवतो - अजित पवार

भाजप -शिवसेनेला निवडणुकांवेळी राम आठवतो - अजित पवार

कोल्हापूर : कॉंग्रेस,राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांनी इव्हीएमला विरोध केला असताना महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र इव्हीएमचे समर्थन केले आहे. पंजाब, कर्नाटक, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान या निवडणुकांचे निकाल पाहता ईव्हीएममध्ये काही घोटाळा नसल्याचा निर्वाळाच जणू पवार यांनी दिला आहे. ईव्हीएमची काळजी न करता केवळ योग्य चिन्हाचे बटण दाबा, असा सल्लाही त्यांनी दिला. इचलकरंजी येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, केंद्रात आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकारकडे सांगण्यासारखे काहीही राहिलेले नाही. त्यामुळे निवडणुका तोंडावर आल्या असताना त्यांना प्रभु रामचंद्रांची आठवण होत असल्याचा टोलाही पवार यांनी यावेळी लावला. राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करण्यात येत आहे. आत्तापर्यंत कॉंग्रेस- राष्ट्रवादीचे 40 जागांबाबत एकमत झाले आहे. उर्वरीत 8 जागांबाबतही लवकरच निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारने बड्या राजकीय व्यापाऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. मात्र सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचे सांगून शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष असल्याचे सांगितले. 

मागील पंधरा दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ईव्हीएमदवारे मतदानाला विरोध दर्शवला. जगातील तीन देशातच केवळ ईव्हीएम मशीन वापरले जाते. यात नायजेरिया, भारत आणखी एका अन्य देशाचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीत ईव्हीएम मशीनचा वापर होवू नये, अशी मागणी शरद पवार यांनी केली होती. मात्र त्याउलट अजित पवार यांनी आज भूमिका घेतल्याने नेत्यांसह कार्यकर्तेही चक्रावून गेले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com