आमदारांच्या बैठकीला अजितदादांची दांडी!

...
mla-meeting-deccan-
mla-meeting-deccan-

पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील मतदारांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा यांवर चर्चेसाठी आज झालेल्या आमदारांच्या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच दांडी मारली.

राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकरच सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या आणि आमदारांच्या दृष्टीने प्राधान्याच्या प्राध्यान्याच्या प्रश्नांवर चर्चा करणे हा बैठकीचा प्रमुख हेतू होता. यापूर्वीच्या बैठकांना तत्कालिन पालकमंत्री गिरीष बापट यांची उपस्थिती असे. मागील सरकारमध्ये शेवटच्या टप्प्यात पुण्याचे पालकमंत्री राहिलेले चंद्रकांतदादा पाटील आजच्या बैठकीला उपस्थित होते. मात्र, विद्यमान पालकमंत्रीच आले नाहीत.

विशेष म्हणजे, पुण्यात अजूनही पवार हे पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाच्या बैठकीला न आल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात आले.

पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील मतदारांचे प्रश्‍न, त्यावरचा उपाय आणि ते सोडविल्यानंतरचा परिणाम काय असेल, या अनुषंगाने "सकाळ'ने आयोजित केलेल्या या बैठकीत सहभागी आमदारांनी अतिशय नेमकेपणाने मुद्दे मांडले.

अत्यंत वेगाने नागरीकरण होत असलेल्या या जिल्ह्यात शहरी-ग्रामिण भेद होऊ नये, अशी अपेक्षा आमदारांनी बैठकीत अतिशय स्पष्टपणाने व्यक्त केली. आपले मुद्दे तयारीनिशी आमदारांनी बैठकीत सादर केले. पुणे जिल्ह्यातून आठ लोकप्रतिनिधी आमदार म्हणून पहिल्यांदाच विधीमंडळात अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ आमदारांच्या अनुभवाचा फायदा सर्वांना व्हावा, हाही बैठकीचा उद्देश होता.

वाहतूक, पाणी, कचरा, रस्ते, आरोग्य आदी पुणेकरांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे आमदारांनी आवर्जून सादर केले. जवळपास तीन तास झालेल्या बैठकीला पवार फिरकले नाहीत. विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील, आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, राहूल कुल, अशोक पवार, मुक्ता टिळक, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, संजय जगताप, लक्ष्मण जगताप, अतुल बेनके, अनंत गाडगीळ, शरद रणपिसे यांनी बैठकीला पूर्णवेळ थांबून आपापल्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्‍न मांडले आणि विधीमंडळाच्या अधिवेशनात ते लावून धरण्याचा निर्धार केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com