ajit pawar about nivedita mane | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
नितेश राणे यांना 8483 मतांची आघाडी पाचवी मतमोजणी फेरी पूर्ण
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर.
सिल्लोड : पहिल्या फेरीमध्ये शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना 2167 मतांची आघाडी
पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर
बारामती : बारामतीत अजित पवार आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

निवेदिता मानेंना पक्षाने देता येईल तेवढे दिले!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 डिसेंबर 2018

मतभेद असले, तरी सर्वजण शरद पवार यांचे नेतृत्व मानतात.

इचलकरंजी : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यातील 40 जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित आठ जागांबाबत  संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी येथे दिली. 

येथील बालाजी पतसंस्थेच्या कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांत जागावाटपाचे काम सुरू आहे. आतापर्यंत 40 जागांबाबत निर्णय झाले आहेत. अधिवेशन आणि कॉंग्रेसच्या संघर्षयात्रेमुळे आठ जागांबाबत निर्णय घेणे अद्याप प्रलंबित आहे. बुधवारी (ता. 19) याबाबत पुन्हा बैठक होणार आहे. त्यामध्ये हा निर्णय होईल, असे श्री. पवार यांनी सांगितले. 

पक्षातील स्थानिक गटबाजीबाबत विचारले असता, अजित पवार यांनी स्थानिक पातळीवर मतभेद असले, तरी सर्वजण शरद पवार यांचे नेतृत्व मानतात. अन्य राजकीय पक्षांतही स्थानिक पातळीवर मतभेद असल्याचे स्पष्टीकरण दिले. 

श्रीमती निवेदिता माने यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत बोलताना ते म्हणाले, "राष्ट्रवादीने त्यांना महिला आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष केले. जिल्हा बॅंकेत अध्यक्ष केले. दोनवेळा खासदार केले. त्यामुळे पक्षाने देता येईल तेवढे त्यांना दिले आहे.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख