विखेंना खूष करण्यासाठी नेते बोलले, पण जागा सोडणार नाही हा अजित पवारचा शब्द आहे! - ajit pawar about nagar loksabha | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

विखेंना खूष करण्यासाठी नेते बोलले, पण जागा सोडणार नाही हा अजित पवारचा शब्द आहे!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

नगर : काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाला विखे यांना खूष करण्यासाठीच काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या नगर  जागेविषयी वक्तव्य केले. त्यात तथ्य नाही. ही जागा राष्ट्रवादीच लढवेल, हा माझा शब्द आहे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसजनांच्या वक्तव्याला फाटा दिला.

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त पवार नगरला आज आले होते. या वेळी बोलताना त्यांनी नगरची जागा सोडणार नसल्याचे ठणकावून सांगितले. ते म्हणाले, या मतदारसंघात दोन विधानसभेचे, तर एक विधान परिषदेचे असे तीन आमदार आहेत. पारनेरमध्येही राष्ट्रवादीला वातावरण चांगले आहे. राहुरीचे चित्रही राष्ट्रवादीच्या दृष्टीने चांगले आहे. असे चांगले वातावरण असताना ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. शुक्रवारी (ता. १२) काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक होणार आहे. त्यात याबाबत चर्चा होणार आहे. मात्र काहीही झाले, तरी ही जागा राष्ट्रवादीच लढविणार, यात बदल होणार नाही, असे पवार म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख