मंगळवेढा : अजित जगताप भाजपच्या गळाला? आमदार परिचारक गटाला होणार फायदा?

पक्षनेते अजित जगताप यांनी विकासकामाच्या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे जगताप सध्या भाजपाच्या गळाला लागले, की काय याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यांच्यामुळे शहरात भाजपाला आणखीन विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. पर्यायाने आगामी विधानसभा निवडणुकीत याचा लाभ आमदार परिचारक गटाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंगळवेढा : अजित जगताप भाजपच्या गळाला? आमदार परिचारक गटाला होणार फायदा?

मंगळवेढा : पक्षनेते अजित जगताप यांनी विकासकामाच्या निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यामुळे जगताप सध्या भाजपाच्या गळाला लागले, की काय याची चर्चा शहरात सुरू आहे. त्यांच्यामुळे शहरात भाजपाला आणखीन विस्तार करण्याची संधी मिळणार आहे. पर्यायाने आगामी विधानसभा निवडणुकीत याचा लाभ आमदार परिचारक गटाला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शहरात नगरपालिकेच्या राजकारणामध्ये शहा कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. विद्यमान नगरपालिकेवर रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा व आमदार भारत भालके यांच्या गटाचे पालिकेवर वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असलेले जगताप यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या निवडणूकीत विजय मिळवल्यावर जिल्ह्यात हिरो ठरले. परंतु पालिकेतील अंतर्गत दुसऱ्या कारभाराला त्रस्त झालेले अजित जगताप हे सध्या लांबूनच अंतरावर आहेत. ते मोहिते पाटील गटाच्या भाजप प्रवेशाचा निर्णयाच्या वेळी विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मांडीला मांडी लावून होते. 

विजयसिंह मोहिते पाटलांनी अधिकृत भाजपाचा प्रवेश केला नसल्यामुळे ते देखील अंतरावर होते. परंतु सध्या नगरपालिकेतील विविध विकास कामाला निधी आणण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची संधी साधून विधान परिषदेचे सदस्य प्रशांत परिचारक व शहराध्यक्ष गौरीशंकर गुरुकुल यांच्या सोबतीने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

या भेटीत त्यांनी शहरातील नाट्यगृहासाठी स्वतंत्र फिडर व अन्य विकास कामाला निधी देण्याची मागणी केली. परंतु या मागणीचे छायाचित्र सोशल मीडियामध्ये आले असले तरी प्रत्यक्ष या छायाचित्राच्या पाठीमागे घडलेली चर्चादेखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे गत विधानसभा निवडणुकीमध्ये निसटता पराभव स्वीकारला करावा लागलेल्या आमदार परिचारक गटाला आगामी विधानसभा सोयीची व्हावी या दृष्टीने माजी मंत्री ढोबळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बबनराव आवताडे यांचा गट व अजित जगताप यांचा गटाचा लाभ होऊ शकणार असला तरी ही जागा शिवसेना-भाजपा युती कुणाकडे जाते हे देखील आगामी काळात महत्त्वाचे ठरणार आहे. आजमितिला पक्षनेते अजित जगताप याचा निर्णय मात्र निर्णायक वळणावर येवून ठेपला आहे. त्यांच्यासोबतीने आणखी काही नगरसेवक भाजपाच्या गळाला लागतात का हे पाहणे देखील उत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com