अजितदादांची नव्या मुंबईत डरकाळी, म्हणाले,""कोणा सोम्या गोम्याने गडबड करू नये !'' '

 अजितदादांची नव्या मुंबईत डरकाळी, म्हणाले,""कोणा सोम्या गोम्याने गडबड करू नये !'' '

नवी मुंबई : महाविकास आघाडी ही शरद पवार,सोनिया गांधी,उद्धव ठाकरे या तिघांनी मिळवून तयार केली आहे. आम्ही तिघे एकत्र आल्यामुळे कोणा सोमा गोम्याने गडबड करू नये. आरेला कारे करायची ताकदही आमच्यात आहे असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज नवी मुंबईत दिला. 

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येणार असून तशी घोषणा आज अर्थमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे एकत्र आले होते. यावेळी अजित पवार यांनी माजी मंत्री गणेश नाईक आणि भाजपचे नाव न घेतात इशारा दिला.

ते म्हणाले, की अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर 4 लाख कोटीच नुकसान शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळाल. सीएए आणि एनआरसी संदर्भात कोणीही मागणी केलेली नव्हती.आम्ही राज्यात कोणाच्या केसाला धक्का लावू देणार नाही. 

नवी मुंबई मधील हुकूमशाही ही बाजूला करायची आता गरज आहे. शिव भोजन थाळी साठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही अजितदादांनी यावेळी सांगितले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com