विमान अजून पोहोचले नाही...पृथ्वीराज चव्हाण संपर्कात आहेत...

prithviraj chavan
prithviraj chavan

कऱ्हाड :  कोरोना व्हायरस साथीमुळे चीनमध्ये अडकलेल्या साताऱ्याची विवाहिता अश्विनी पाटील यांच्यासह नव्वद भारतीयांना भारतात परत आणण्यासाठी केंद्र शासनाने खास विमानाची सोय केली आहे. येत्या 20 फेब्रुवारीला विशेष विमान त्यांना आणण्यासाठी जाणार होते. मात्र अद्याप विमान पोहोचलेले नाही. मात्र मी संपर्कात आहे, असा विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

चव्हाण यांनी आज सांगितले की सकाळी वूहानला अश्विनी पाटील यांच्याशी बोललो. आज सरकार वायुसेनेचे सी-१३० विमान चीनमध्ये अजून अडकलेल्या सुमारे ९० भारतीयांना परत आणण्यासाठी पाठवित आहे. काही अडचणींमुळे अजून विमान पोहोचले नाही. दूतावासाने सर्वांना निघण्यासाठी तयार रहावयाला सांगितले आहे. मी संपर्कात आहे.

चीनमधील वुहान प्रांतात अडकलेल्या साताऱ्याची विवाहिता आश्‍विनी पाटील त्यांच्याशी व्हिडीओ कॉलव्दारे संपर्क करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांची नेमकी समस्या जाणून घेतली होती. तसेच त्यांना भारतात परत आणण्यासाठी ते स्वत: परराष्ट्र व्यवहार मंत्री तसेच भारताचे चीनमधील राजदुत यांच्याशी संपर्क करून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. आमदार श्री. चव्हाण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परराष्ट्र मंत्रालय येथे पत्रव्यवहार करून पाटील यांना लवकरात लवकर भारतात आणण्याच्या हालचाली कराव्यात, अशी मागणी केली होती.

त्यांनी चीन येथील भारतीय दूतावसातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. त्यामुळे आश्‍विनी यांच्यासह नव्वद लोकांची चीनमधून सुटा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत स्वत: अश्विनी पाटील यांनी माझ्यासह नव्वद भारतीयांची सुटका होणार आहे, असा मेसेज त्यांनी आमदार श्री. चव्हाण यांना पाठवला आहे. त्यांना तेथून घेऊन येण्यासाठी सरकारने मोठी मोहिम हाती घेतली आहे. हवाई दलाचे सी 17 ग्लोबमास्टर हे विमान चीनला पाठविले जाणार आहे. सी 17 ग्लोबमास्टर हे हवाई दलाचे अवजड वाहतूक करणारे विमान नव्वद भारतीयांना घेऊन येणार आहे. हे विमान 20 फेब्रुवारीला दिल्लीहून रवाना होईल. चीनमध्ये त्याच दिवशी ते पोहोचेल. चीनमधून सर्व भारतीयांना घेऊन मायदेशी परत येणार आहे, असे अश्विनीने म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com