सर्वांच्या नजरा अमित ठाकरेंच्या विवाह सोहळ्याकडे ! - Aii eyes set on Amit Thackarey's grand marriage ceremony | Politics Marathi News - Sarkarnama

सर्वांच्या नजरा अमित ठाकरेंच्या विवाह सोहळ्याकडे !

सरकारनामा
शनिवार, 26 जानेवारी 2019

अमित आणि मिताली यांचा शुभ विवाह  लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे होणार आहे .  लग्नाचा मुहूर्त  दुपारी १२ वाजून ५१ मिनीटांचा  आहे.  

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे सोमवारी मिताली बोरुडे  यांच्याशी विवाहबद्ध होत असून या विवाह  सोहळ्याला राजकारण , उद्योग आणि चित्रपट क्षेत्रातील कोण कोण हजर राहणार याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत .

अमित आणि मिताली यांचा शुभ विवाह  लोअर परळ येथील सेंट रेजिस येथे होणार आहे .  लग्नाचा मुहूर्त  दुपारी १२ वाजून ५१ मिनीटांचा  आहे.   रविवारी  संध्याकाळी आप्तेष्टांच्या उपस्थितीत  हळदीचा कार्यक्रम पडला.  राज ठाकरे यांचे 'कृष्णकुंज' हे निवासस्थान आणि परिसर दिव्यांच्या  रोषणाईने उजळून निघाला  आहे . कृष्णकुंजवर लग्नाची धावपळ जोरात सुरु असून मान्यवरांची वर्दळ वाढली आहे . 

अमितचे काका आणि शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना घरी जाऊन राज यांनी निमंत्रण पत्रिका दिलेली आहे . उद्धव  ठाकरे सहकुटुंब पूर्णवेळ या सोहळ्यास हजर  राहणार आहेत असे समजते . मनसेचे नेते आणि  कार्यकर्ते आपल्या परीने हा सोहळा संस्मरणीय ठराव म्हणून झपाटून कामाला लागले आहेत . 

अमित ठाकरे यांच्या लग्न पत्रिकेवर  निमंत्रक म्हणून राज ठाकरेंशिवाय पत्नी शर्मिला  , बहीण उर्वशी , राज ठाकरेंच्या मातोश्री  मधुवंती  ठाकरे आणि राज ठाकरेंच्या सासूबाई यांची नावे आहेत .   

उद्योगपती रतन टाटा, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस,  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण, सुशील कुमार शिंदे, अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, छगन भुजबळ,समाजवादी पार्टीचे अबू आझमी , नारायण राणे , रामदास आठवले  आदी मान्यवरांना  निमंत्रणे  पोहोचलेली आहेत .     

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांना निमंत्रित करण्यात आले असले तरी त्यांच्या उपस्थिती विषयी अद्याप कन्फर्मेशन आले नसल्याचे समजते . 

ख्यातनाम गायिका लता मंगेशकर आणि राज ठाकरे यांचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत .त्यादेखील हजर राहणार असल्याचे समजते .  

हिंदी चित्रपट सृष्टीतील मान्यवर अभिनेते अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, अमीर खान, अभिनेत्री  माधुरी दीक्षित, प्रसिद्ध लेखक आणि कवी जावेद अख्तर , शबाना आझमी आदी कलाकारांनी या सोहळ्याला हजर राहता यावे यासाठी २७ जानेवारीला आपण मुंबईतच असू याचे नियोजन केलेले आहे . मराठी चित्रपट सृष्टीतील आणि रंगभूमीवरील अनेक अभिनेते आणि  कलावंत देखील हजर राहणार आहेत .    

अमित आणि मिताली यांच्या  मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.  अमित आणि  मिताली बोरुडे यांचा साखरपुडा  डिसेंबर   २०१७ मध्ये महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये पार पडला होता .  मिताली बोरुडे प्रख्यात सर्जन डॉ. संजय बोरूडे यांच्या  कन्या असून त्या नावाजलेल्या  फॅशन डिझायनर आहेत .  आहे. अमित ठाकरेंची बहीण   उर्वशी आणि मिताली यांची चांगली मैत्री आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख