अशोक पवारांवर हेलिकाॅप्टरमधून पु्ष्पवृष्टीचा शिरूरमध्ये अजून धुरळा!

शिरूरमध्ये रांजणगाव हीश्रीमंत ग्रामपंचायत आहे. त्यामुळे या गावातील घडामोडींची तालुक्यात चर्चा असते.
अशोक पवारांवर हेलिकाॅप्टरमधून पु्ष्पवृष्टीचा शिरूरमध्ये अजून धुरळा!

तळेगाव ढमढेरे : शिरूरचे नवनिर्वाचित आमदार अशोक पवार यांच्यावर रांजणगाव गणपती येथे हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.अष्टविनायक महागणपती मंदिर ते बसस्थानकापर्यंत आमदार पवार यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर जाहीर सत्कार करण्यात आला. या हेलिकाॅप्टर वर्षावाचा धुरळा शिरूर तालुक्यात अजून उडत आहे.

या गावात राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये दोन गट आहे. एका गटाने अशोक पवार यांच्या विरोधात तालुक्यात प्रचार केल्याची चर्चा आहे. त्यामुळे दुसऱ्या सत्ताधारी गटाने अशोक पवारांचा जंगी सत्कार केला. या वेळी अशोक यांनीही चिमटे काढले. शिरूरमध्ये रांजणगाव ही श्रीमंत ग्रामपंचायत आहे. त्यामुळे या गावातील घडामोडींची तालुक्यात चर्चा असते. येथे सत्ताधारी गटाने विरोधी गटावर मात करण्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 

``माझ्या निवडणूक काळात तालुक्यातील व मतदार संघातील अनेक रथी-महारथी पक्षाला सोडून गेले परंतु माझ्याबरोबर कार्यकर्ते व सर्वसामान्य लोक राहिले त्यांनीच निवडणूक हातात घेतली आणि भरघोस मतांनी विजयी केले लोकांच्या ऋणात राहण्यातच मी धन्यता माणनारा छोटा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील अनेक नेते आदरणीय शरद पवार व राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाला सोडून गेले अशा गयारामांची आज परिस्थिती काय झाली आहे हे वेगळे सांगायला नको. निवडणुकीत कोणी विरोधी काम केले याची माहिती नेते अजितदादा पवार यांच्यापर्यंत पोचली असल्याची कोपरखळी त्यांनी विरोधकांना मारली. ज्येष्ठ नेते शरद पवार,अजितदादा पवार,खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर प्रेम करणारी जनता तालुक्यात असल्याने मतदारांनी झुकते माप दिल्याचे त्यांनी सांगितले. 

पवार म्हणाले की शिरूरमधील ३९ गावे आंबेगावला जोडली असली तरी कोणताही दुजाभाव न करता विकासाला प्राधान्य देणार असून शिरूर तालुका आज,उद्या व भविष्यातही तसाच अखंडीत राहणार आहे. रांजणगाव एमआयडीसीत कायद्यानेच सर्वकाही होईल,तेथे कोणतीही अ़डचण येवू देणार नाही. तसेच कोणाचीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

अष्टविनायक देवस्थानच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. गेल्या पाच वर्षात शिरूर तालुक्यातील प्रशासन विस्कळीत झाले होते आता मी आमदार झाल्यापासून प्रशासनात आपोआप सुधारणा झाली आहे. अजून कोणत्याही कार्यालयात गेलो नसलो तरी आपल्या कामाचा दरारा पाहूनच प्रशासन चोख कामे करते, असा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार डाॅ.अमोल कोल्हे यांच्या माध्यमातूनही विविध कामे करून जनतेला न्याय देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषदेच्या सभापती सुजाता पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविबापू काळे,कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष रणदिवे,पंचायत समितीचे सभापती विश्वास कोहकडे, माजी उपसभापती आबासाहेब पाचुंदकर, माजी आदर्श सरपंच भीमाजीराव खेडकर, प्रा.माणिकराव खेडकर, लोकनियुक्त सरपंच सर्जेराव खेडकर, उपसरपंच राहुल पवार, बाजार समितीचे सभापती शशीकांत दसगुडे आदी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com