हुंकार रॅलीच्या आयोजनापासून हंसराज अहिर दूर ?, जबाबदारी आमदार शामकुळेंवर

हुंकार रॅलीच्या आयोजनापासून हंसराज अहिर दूर ?, जबाबदारी आमदार शामकुळेंवर

चंद्रपूर : अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने येत्या 25 नोव्हेंबरला नागपूरला हुंकार रॅली आयोजित केली. या रॅलीत जास्तीत कार्यकर्ते सहभागी व्हावे, यासाठी विधानसभानिहाय बैठका घेतल्या जात आहे. चंद्रपुरात आमदार नाना शामकुळे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या या हुंकार रॅलीपासून चंद्रपूरचे खासदार व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर मात्र दोन हात दूर आहेत. यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

अयोध्येत राममंदिरासाठी कायदा करा, असा सल्ला देणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जनआंदोलन करण्याचे ठरविले आहे. त्याच अनुषंगाने हुंकार रॅलीचे आयोजन केले आहे. यासाठी विधानसभा नियोजन केले जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू परिषद आणि भाजप यांच्या संयुक्त बैठका होत आहे. आतापर्यंत अशा तीन बैठक चंद्रपुरात झाल्या आहे, असे आमदार शामकुळे यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. 

आतापर्यंत झालेल्या एकाही बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी हजेरी लावली नाही. त्यांचे समर्थकांनीही या बैठकीला हजर राहण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या हुंकार रॅलीसाठी अहिर यांचा अनुत्साह कमालीचा आश्‍चर्यकारक असल्याचे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. 

आमदार शामकुळे यांनी घेतलेल्या बैठकीत स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजय एंगलवार, विश्‍वहिंदू परिषदेचे विनोद उपाध्याय उपस्थित होते. चंद्रपुरातून किमान दोन हजार कार्यकर्ते गेले पाहिजे, असे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी निर्देश दिले. या मुद्यावरून पुढील काळात वातावरण तापविले जाणार आहे. त्याची पार्श्‍वभूमीवर तयार करण्यासाठी या बैठकांचा उपयोग होईल, असे बैठकीतील उपस्थित एकाने सांगितले. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com