agitation of satara collector office employees | Sarkarnama

वाळू ठेकेदारांच्या मारहाणीमुळे साताऱ्याचे महसूल कर्मचारी घाबरले 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

सातारा : महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर मोकातंर्गत कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

सातारा : महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांवर मोकातंर्गत कारवाई करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

वहागांव (ता. कऱ्हाड) जवळ अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचालकासह अन्य सहा जणांनी कऱ्हाड महसूल विभागातील गौण खनिज विभागाचे अव्वल कारकून मकरंद साळुंखे व लिपिक संतोष गुलाणी यांना मारहाण, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी (ता. 30) घडला. याप्रकरणी तळबीड पोलिसांत अनोळखी सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आज बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. संबंधितावर मोकाअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी महसूल कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख