इंदोरीकर महाराजांच्या समर्थनार्थ रविवारी अकोले तालुका बंद 

agitation calls in akola taluka in support of indorikar
agitation calls in akola taluka in support of indorikar

अकोले (नगर) : निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या समर्थनार्थ अकोलेकर एकवटले असून, रविवारी (ता. 23) तालुका बंद ठेवण्यात येणार आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीचे महाराजांचे समर्थनार्थ ठराव देऊन रविवारी टाळ, मृदुगाच्या स्वरात मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे.

तालुक्यातील महाराजांच्या चाहत्यांनी आज दुपारी अकोले येथे बैठक झाली. या वेळी महाराजांच्या समर्थनार्थ तालुक्याने उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराजांची नाहक बदनामी सुरू आहे. महाराजांनी कीर्तनात पुत्र प्राप्तीविषयी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. वक्तव्यावर झालेल्या वादानंतर महाराजांनी दिलगिरी व्यक्त करूनही सुडाचे भावनेने गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र रचून महाराजांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशा भावना अनेकांनी बैठकित व्यक्त केल्या. 

अकोले तालुक्याच्या वतिने निषेध करुन महाराजांच्या समर्थनार्थ उभे राहताना महाराजांच्या समर्थनार्थ तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ठराव करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवार व शनिवार सुट्टी असल्याने उद्या गुरूवारीच सर्व ग्रामपंचायत ठराव देण्याचे ठरले आहे. त्याबाबतचा मजकूरही बैठकित देण्यात आला. तसेच रविवार संपूर्ण तालुका बंद ठेवुन महाराजांचे गाव असलेल्या इंदोरी येथून मोटारसायकल रॅलीने अकोले शहरात येवून महात्मा फुले चौकातुन टाळ मृदुंगाच्या निनादात बाजारतळापर्यत मोर्चा काढण्यात येणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com