पिचड यांच्याविरोधातील घोषणांनी गाजले जनआक्रोश आंदोलन

माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या विरोधात आज अकोले येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपनेते अशोक भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐन पावसात सुरू झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.
पिचड यांच्याविरोधातील घोषणांनी गाजले जनआक्रोश आंदोलन

अकोले (नगर) : माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या विरोधात आज अकोले येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. भाजपनेते अशोक भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐन पावसात सुरू झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. 

ज्येष्ठ नेते पिचड यांच्या दुसऱ्या पत्नी व आमदार वैभव पिचड यांच्या सावत्र आई कमल देशमुख-पिचड या मराठा समाजाचे आहेत, परंतु पिचड यांनी मंत्रिपद व राजकीय शक्तीचा वापर करून कमल देशमुख-पिचड या आदिवासी असल्याचा खोटा दाखला मिळवला. त्याचा वापर करून तालुक्यातील आदिवासींची लूट केली, असा आरोप भांगरे यांनी केला होता. बिगर आदिवासी असलेल्या दुसऱ्या पत्नीच्या नावे आदिवासी असल्याबाबतचा खोटा दाखला मिळवला व त्याचा वापर करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बळकावण्याचा आरोपही त्यांनी केला होता. या कृतीचा निषेध म्हणून आज अकोले येथे आंदोलन करण्यात आले. 

कार्यकर्त्यांनी शहरातील बाजार तळावर आंदोलनास प्रारंभ केला. मोर्चा बाजारतळावरुन महात्मा फुले चौकात जाऊन तहसील कार्यालयात आला. या वेळी मोर्चात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डाॅ. किरण लहामटे, सुनिता भांगरे, शिवसेनेचे पंचायत समिती उपसभापती मारुती मेंगाळ, अमित भांगरे, शर्मिला येवले यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज उपस्थित होता.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com