ईव्हीएम हटावसाठी 21 ऑगस्टला सर्वपक्षीय मोर्चा: राज ठाकरे

ईव्हीएमविरोधात राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकवटल्याचे चित्र शुक्रवारी दिसले .
Raj_Thakre_ Ajit_Pawar.
Raj_Thakre_ Ajit_Pawar.

मुंबई :  ईव्हीएम हटावसाठी २१ ऑगस्टला मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा  काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली . ईव्हीएमविरोधात राज्यातील सर्व विरोधी पक्ष  एकवटल्याचे चित्र शुक्रवारी दिसले .

राज ठाकरे यांच्याशिवाय अजित पवार , जयंत पाटील, विद्या चव्हाण , छगन भुजबळ (राष्ट्रवादी काँग्रेस ), बाळासाहेब थोरात ( काँग्रेस ),जयंत पाटील (शेकाप ) , राजू शेट्टी ( स्वाभिमानी शेतकरी संघटना ) ,   बी जी कोळसे पाटील ( जेडीएस ), कपिल पाटील आदी  नेत्यांनी एकत्रितपणे ईव्हीएम मशीन विरोधात एल्गार पुकारला आणि पूर्वीच्याच मतपत्रिका पद्धतीने मतदान घ्यावे अशी मागणी केली .

 राज ठाकरे पुढे म्हणाले, ईव्हीएम विरोधात सगळे जमलेत .  मागच्या बोर्ड वर कोणत्याही राजकीय पक्षांचं नाव नाही . आंदोलन देखील आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाच्या पक्षाचा झेंडा न घेता करणार.  21 तारखेला सर्व पक्षीय मोर्चा असेल. दरम्यान सगळ्यांकडून फॉर्म भरून घेणार आणि  ते निवडणूक आयोगाला देणार. 


ईव्हीएम मशीनच्या चिप अमेरिकेतून बनवून येतात. आधीच अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीवरूनच वाद सुरु आहे. मतप्रक्रिया हॅक करून ते निवडून आल्याचा त्यांच्या विरोधकांनी आरोप केलेला आहे . भारतातही अनेक ठिकाणी झालेल्या मतदानापेक्षा वाढीव मतदानाचे आकडे ईव्हीएमवर आलेले आहेत . 
   
या वेळी बोलताना अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले, सत्ताधाऱ्यांनी  अंदाज व्यक्त केले तसे  निकाल लोकसभेला लागले . अनेकांनी मागणी बेलेट पेपरवर मतदानाची मागणी  केली होती. या विषयावर राज यांनी सोनियाजी आणि इतरांची भेट घेतली आहे. महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांशीही ते बोलले आहेत . भूमिका घेऊन लोकांच्या समोर गेलं पाहिजे .

  मतदान प्रक्रिया पारदर्शक  व्हायला पाहिजे असे आमचे मत आहे .  चिप ऍडजस्ट होणे , मशीन हॅक  होणे अशा  अनेक शंका घेतल्या जातात.  वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या  मान्यवरांनी शंका उपस्थित केली आहे.  त्यासाठी आमची मागणी आहे की बेलेट पेपर वर निवडणुका घ्याव्यात . 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले , प्रत्येक  राज्यात हा उठाव होणार आहे . याची सुरुवात महाराष्ट्रात होणार आहे .  संभ्रमाचे  वातावरण संपूर्ण देशात आहे . निवडणूक आयोगाची  ही  जबाबदारी आहे की संभ्रम दूर झाला पाहिजे . 


राजू शेट्टी म्हणाले, स्वच्छ आणी परदर्शक मतदान होण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्रित येऊन हे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे . ग्रामीण मतदारांना आवाहन की 15 तारखेला ग्रामसभेत बॅलट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणारा  ठराव करावा. 

 छगन भुजबळ म्हणाले, या निकालांनी  निवडून आलेल्याना धक्का बसलाय आणि हारणाऱ्यालादेखील धक्का बसलाय  .
ज्या एव्हीएमवर आम्हाला विश्वास नाही तर मतपत्रिका का नाही वापरात ? वेळ लागणार असेल तर टेबल वाढवा, मनुष्यबळ काय  कमी आहे का? ज्या  प्रक्रियावर विश्वास नसेल तर ती प्रक्रिया फेकून दिली पाहिजे.  पंतप्रधानांनी सांगितले सबका विश्वास मग निवडणूक प्रक्रियावरील विश्वास लोकांचा उडालाय त्याचे काय ? 

 बी जी कोळसे पाटील म्हणाले ,  मी तर 2013 पासून ईव्हीएमला विरोध केलेला आहे . सुप्रीम कोर्टाने मागे हे मशीन नाकारलीय. 191 देशपैकी 18 देश फक्त ईव्हीएमचा वापर करतात बाकीच्यांनी बंद केले आहे . 

 जयंत पाटील म्हणाले, अनेक ठिकाणी वाढीव आकडे आले कुठून? बॅ लेट पेपरद्वारे मतदान झालं पाहिजे  हा फॉर्म राज यांनी बनवलाय . तो घरघरात पोचवण्याचा काम करणार. 

विद्या चव्हाण म्हणाल्या ,12 जून ला 84 वेगवेगळ्या संघटनांनी पत्रकार परिषद घेतलेली होती . आकडेवारी निवडणूक आयोगाकडची आणि प्रत्यक्षातली यात काही ताळमेळ नाही . ग्रामीण महिला सांगतात की आम्हाला हवं ते मतदान केलं तर कमळ दिसलं. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com