धनंजय मुंडे, त्यावेळी तुम्ही शाळेत जात होता!

पाचपुते यांची त्यांनी माफी मागितली नाही, तर मुंडे यांना श्रीगोंदे तालुक्‍यात फिरू देणार नाही.
धनंजय मुंडे, त्यावेळी तुम्ही शाळेत जात होता!

श्रीगोंदे (नगर) : माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खालच्या पातळीवर टीका केल्याचा, तालुका भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज श्रीगोंदे तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निषेध केला. 

शिवस्वराज्य यात्रेदरम्यान जिंतूर येथील आयोजित सभेत मुंडे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. सभेत पाचपुते यांच्यावर त्यांनी खालच्या पातळीवर टीका केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. मुंडे यांच्या या विधानाचा निषेध करण्यासाठी आज तालुका भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. 

"तुम्ही जेव्हा शाळेत जायचा, तेव्हा बबनराव पाचपुते विधानसभेत होते. तुम्हाला अजून एकदाही विधानसभेला निवडून येता आले नाही. दुसरीकडे, पाचपुते सहा वेळा आमदार होते. त्यामुळे मुंडे यांनी पात्रता सोडू नये. सभ्य भाषेचा आग्रह धरणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या संस्कारक्षम नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे मुंडे यांना ही भाषा शोभत नाही,' अशी टीका उपस्थित कार्यकर्त्यांनी केली.
 
पाचपुते यांची त्यांनी माफी मागितली नाही, तर मुंडे यांना श्रीगोंदे तालुक्‍यात फिरू देणार नाही, असा इशारा देण्यात आला. या वेळी पोपटराव खेतमाळीस, भाऊसाहेब गोरे, शहाजी हिरवे, अशोक खेंडके, संदीप नागवडे, बापू गोरे, एम. डी. शिंदे, प्रतिभा झिटे, संतोष खेतमाळीस, काका कदम, खंडू नागवडे आदी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com