भारत भालके यांच्या विरोधात निघणार पदयात्रा 

पंढरपूर तालुक्‍याचा आर्थिक कणा समजाला जाणारा विठ्ठल साखर कारखाना यंदा बंद आहे.
agitation against bharat bhalke
agitation against bharat bhalke

पंढरपूर, जि. सोलापूर (प्रतिनिधी) : ‘‘श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके आणि संचालक मंडाळाच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांत जनजागृती करण्यासाठी कारखान्याचे संस्थापक (कै.) औदुंबरअण्णा पाटील यांच्या येवती (ता. मोहोळ) या गावातून पदयात्रा काढण्यात येणार आहे. तिचा समारोप भालके यांच्या सरकोली (ता. पंढरपूर) येथे केला जाणार आहे’’, अशी माहिती डॉ. बी. पी. रोंगे यांनी दिली. 

डॉ. रोंगे म्हणाले, ‘‘पंढरपूर तालुक्‍याचा आर्थिक कणा समजाला जाणारा विठ्ठल साखर कारखाना यंदा बंद आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांचे प्रचंड नुकसान झाले. अध्यक्ष व संचालक मंडळाने कारखान्याच्या गाळप हंगामाची परंपरा मोडीत काढली आहे. त्यातच चुकीच्या कारभारामुळे कारखान्याची परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. त्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष आणि त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहे.’’ 

या संदर्भात तालुक्‍यातील विठ्ठल परिवारातील काही तरुण कार्यकर्त्यांची पंढरपूर येथे बैठक झाली. या बैठकीत कारखान्याच्या कारभाराबाबत चर्चा झाली. त्यातूनच शेतकरी आणि कामगारांत जनजागृती करण्यासाठी ही जनजगृती पदयात्रा काढण्यात येणार आहे. माजी संचालक शेखर भोसले, दीपक वाडदेकर, माऊली हळणवर, दीपक भोसले, सचिन पाटील, तानाजी बागल, दिलीप भोसले आदींसह शेतकरी सभासद उपस्थित होते. 

कामगारांचे अनेक महिन्यांचे पगार थकीत आहेत. मागील गळीत हंगामातील काही शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम थकीत आहे. सध्याच्या संचालक मंडळविरोधात शेतकरी सभासद आणि कामगारांत प्रचंड असा रोष आहे. या रोषाला तोंड फोडण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येईल. 
- डॉ. बी. पी. रोंगे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com