कर्नाटकातील मतदानासाठी पुण्यात सेटिंग

कर्नाटकातील मतदानासाठी पुण्यात सेटिंग

वडगाव शेरी : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्या मतदारांना हुडकत हुडकत भाजप आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी पुण्यापर्यंत पोहोचले आहेत.

या मतदारांना येण्याजण्याचा खर्च आणि तीन दिवसांची बुडालेली हजेरी देण्याचे कबूल करून मतदारांना लाडिगोडी लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 
 नगर रस्ता भागात विमाननगर, खराडी, धानोरी परिसरातील लेबर कॅम्प आणि मजूर राहात असलेल्या वस्त्यांवर जाऊन भाजप आणि काँग्रेसचे कर्नाटकातील पदाधिकारी संपर्क करीत आहेत. यात मजुरांचे ठेकेदार महत्वाचे असल्याने अगोदर त्यांना गळाला लावण्यासाठी अर्थपूर्ण बोलणी सुरू असल्याचे चित्र विमानागर भागात दिसून आले.

मतदारांना हात पाय बांधून आणा असे वक्तव्य भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येदूरप्पा यांनी नुकतेच केले होते. त्यांचे हे वक्तव्य भाजप पदाधिकाऱ्यांनी खूपच गांभीर्याने घेतल्याचे यातून दिसून येत आहे. कर्नाटकातील विजयासाठी एक एक मत महत्वाचे असल्याने येत्या काही दिवसात   सगळ्याच पक्षाना चांगल्याच उठाबशा काढाव्या लागणार आहेत हे मात्र नक्की.

कर्नाटकमध्ये येत्या शनिवारी मतदान होणार आहे. मतदारांना नेण्याआणण्याचा खर्च, त्यांची निवास व्यवस्था आणि मतदानासाठीचा खर्चही देण्याची तयारी या कार्य़कर्त्यांनी दर्शवली. या मतदारांकडे आधार कार्ड आहे का, याचीही खात्री हे निवडणूक एजंट करत होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com