जयंत पाटील यांच्या फोननंतर ऊसतोड कामगारांच्या पालावर चुली पेटल्या!

मजुरी करण्याची सोय राहिली नाही अनोळखी भागामुळे कोणाला मदत मागणे शक्य नव्हते.त्या मजुरांनी गंगाखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माधवराव शिंदे यांना फोन करून आपली अडचण सांगितली.
जयंत पाटील यांच्या फोननंतर ऊसतोड कामगारांच्या पालावर चुली पेटल्या!

पुणे : " साहेब,उसतोडीला गेलेली आमच्या गावातील माणसं तुमच्या भागात अडकली आहेत.जिल्हाबंदीमुळे त्यांना हिकडं येता येईना.आणि तिकडं जेवण मिळेना ."असा फोन गंगाखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माधवराव  शिंदे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना केला.

 त्या फोननंतर मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांना त्या लोकांच्या जेवणाची सोय करण्याच्या सूचना दिल्या.या फोननंतर काही वेळातच त्या लोकांच्या पालावर रेशन पोहोचले.

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील ऊसतोड मजूर गुरुदत्त साखर कारखान्यासाठी खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे ऊसतोड करत होते.अचानक लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे त्यांच्याकडील जीवनावश्यक साहित्य संपले.

मजुरी करण्याची सोय राहिली नाही अनोळखी भागामुळे कोणाला मदत मागणे शक्य नव्हते.त्या मजुरांनी गंगाखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते माधवराव शिंदे यांना फोन करून आपली अडचण सांगितली. 

माधवराव शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  जयंतराव पाटील यांना त्या ऊसतोड कामगारांची व्यथा सांगितली.

जयंतराव पाटील यांनी तातडीने सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष ऍड.बाबासाहेब मुळीक यांना फोन करून 'त्या' ऊसतोड मजुरांना मदत करण्यास सांगितले.मुळीक यांनी श्रेयस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भाळवणी गावातील राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते नामदेव चव्हाण यांच्यामार्फत ऊसतोडकामगारांच्या पालावर धान्य पोहोच केले.

मुळीक म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसचे नेटवर्क  व्यापक आहे.त्यामुळे अडचणीत असलेल्या लोकांची समस्या आम्हाला समजली आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com