After Jalgaon Win Girish Mahajan in new Form | Sarkarnama

जळगावच्या यशानंतर गिरीश महाजन फाॅर्मात... 

सरकारनामा ब्युरो 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाने तब्बल 57 जागा मिळविल्या. गेल्या 35 वर्षापासून असलेली शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची सत्ता खालसा करून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला आहे. नाशिक महापालिका, जामनेर नगरपालिका आणि जळगाव महापालिकेत भाजपला मोठे यश मिळावून दिल्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन 'फॉर्मात'आहेत. 

जळगाव : जळगाव महापालिकेत अपेक्षेपेक्षाही अधिक यश मिळाल्यामुळे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यात अधिक उत्साह असून त्यांनी कामाचा वेगही वाढविला आहे.
 
जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाने तब्बल 57 जागा मिळविल्या. गेल्या 35 वर्षापासून असलेली शिवसेनेचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची सत्ता खालसा करून महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला आहे. नाशिक महापालिका, जामनेर नगरपालिका आणि जळगाव महापालिकेत भाजपला मोठे यश मिळावून दिल्यामुळे जलसंपदामंत्री गिरीश महाजन 'फॉर्मात'आहेत. 

केरळ येथे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शासनाच्या वतीने डॉक्‍टरांच्या पथकासह मदत घेवून जलसंपदामंत्री गिरीश महाजन गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी मदत कार्यातही काम केले. तेथून परत आल्यावर त्यांनी जळगाव येथे नगरसेवकांची बैठक घेवून केरळ पुरग्रस्तासाठी मदत गोळा करण्याचे अवाहनही केले. त्यादृष्टीने पक्षाच्या माध्यमातून त्यांनी मदत गोळा करण्याचे काम सुरू केले आहे.

मात्र, याच दरम्यान ते पक्षाचेही कार्य करीत आहे. आता धुळे महापालिका निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्यावर आली आहे. यासाठी त्यांनी जळगाव महापालिका पॅटर्न धुळ्यातही राबविण्याची घोषणा केली आहे. धुळे महापालिकेत निवडणूकीसाठी जामनेर, मुक्ताईनगर आणि जळगाव येथील निवडक 200 नगरसेवकांचे भाजपचे पथक घेवून जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. धुळे महापालिका निवडणूकीकडे लक्ष देत असतांनाच त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेतील सत्तेत असलेले भाजपचे वाद सोडविण्याकडेही लक्ष दिले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष,सभापती यांच्यात बेबनाव आहे. त्यांनी या सर्वाना पाचारण करून मध्यस्थी करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या पदाधिकऱ्यांना खडे बोल सुनावून कामात लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत.

या शिवाय धुळे महापालिकेतील निवडणुकीसंदर्भात संरक्षणराज्यमंत्री सुभाष भामरे यांनी जळगाव येथे येवून जलसपदामंत्री महाजन यांची भेटही घेतली आहे. त्यामुळे एकंदरीत जळगावातील यशानंतर मंत्री महाजन मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख