साडेचार वर्ष अध्यापन केले, मग समाजकारणातून राजकारणात आलो...

शिवसेनेसारख्या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करायला लागलो, शाखाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख अशा जबाबदाऱ्या पक्षाने सोपवल्या आणि त्या यशस्वीपणे पार पाडत वाटचाल सुरू केली. दहा वर्ष चिंचडगांवचा सरपंच म्हणून गावातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर घायगाव सर्कलमधून शिवसेनेने जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि विजयी झालो. पक्षाचा साधा पदाधिकारी ते जिल्हा परिषद सदस्य हा चोवीस वर्षांचा प्रवास राजकारणात मला बरेच काही शिकवून गेला.
साडेचार वर्ष अध्यापन केले, मग समाजकारणातून राजकारणात आलो...

औरंगाबाद : राजकारणाची आवड तशी महाविद्यालयीन जीवनापासूनच होती, अगदी विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांमध्ये पॅनल उभे करणे, विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांसाठी झगडणे यातूनच राजकारणाकडे ओढा वाढला. वाणिज्य शाखेत पदवी घेतली, पण त्याकाळात या विद्याशाखेला फारसा वाव नव्हता. पुढे एम. कॉम. केले आणि साडेचार वर्ष वैजापूरच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी केली. पण समाजकार्याची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे शाखाप्रमुखापासून कामाला सुरूवात केली. सरंपच म्हणून गावगाडा हाकला, जिल्हा परिषदेचा सदस्य झालो आणि मिनीमंत्रालयाचा कारभार जवळून पाहता आला. चोवीस वर्षानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माझे राजकीय गुरु वाणी साहेब यांच्यामुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली. वैजापूरकरांनी भरभरून प्रेम दिले, आता पाच वर्षात मतदारसंघातील सर्व स्तरावरील प्रश्‍न सोडवत त्यांची निवड सार्थ ठरवायची आहे. 

शेतकरी कुटुंबात जन्मलेलो असल्यामुळे राजकारणाशी फारसा संबंध कधी आला नाही, किंवा आमच्या घरातील कुणी फार मोठ्या पदावर कुणी गेले असा इतिहासही नाही. काकांनी सरपंच म्हणून काम केले हाच तो काय आमच्या घराण्याचा राजकारणाशी संबंध. वैजापूरात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका लढवल्या, मी स्वतः अनेकदा निवडून आलो. शिक्षण पूर्ण झाल्यावर विनायकराव पाटील महाविद्यालयात सोडचार वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी केली, पण त्यात मन रमत नव्हते. 

शिवसेनेसारख्या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करायला लागलो, शाखाप्रमुख, शहरप्रमुख, तालुकाप्रमुख अशा जबाबदाऱ्या पक्षाने सोपवल्या आणि त्या यशस्वीपणे पार पाडत वाटचाल सुरू केली. दहा वर्ष चिंचडगांवचा सरपंच म्हणून गावातील लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यानंतर घायगाव सर्कलमधून शिवसेनेने जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आणि विजयी झालो. पक्षाचा साधा पदाधिकारी ते जिल्हा परिषद सदस्य हा चोवीस वर्षांचा प्रवास राजकारणात मला बरेच काही शिकवून गेला. 

पक्षप्रमुख व वाणी साहेबांनी विश्‍वास दाखवला... 
2019 च्या विधानसभा निवडणुका माझ्यासाठी नवी संधी घेऊन आल्या. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राजकीय गुरु माजी आमदार आर.एम.वाणी यांचा विश्‍वास आणि अध्यात्मिक गुरू नारायणगिरी महाराजांचे आशिर्वाद लाभले. वैजापूरच्या जनतेने माझा चोवीस वर्षांचा राजकीय प्रवास, लोकांची केलेली कामे, सातत्याने ठेवलेला जनसंपर्क याची पावती म्हणून मला लाखावर मते देत विधानसभेत जाण्याची संधी दिली. प्रदीर्घकाळ राजकारणात असल्याने मतदारसंघातील प्रश्‍न त्यांची तीव्रता मी जाणून आहे. त्यामुळे मिळालेल्या पाच वर्षात यातील बहुतांश प्रश्‍न सोडवून जनतेने दाखवलेला विश्‍वास सार्थ ठरवण्याचा मी कसोशीने प्रयत्न करणार आहे. मतदारसंघातील रस्ते, सिंचनाचे प्रश्‍न, पाणी, वीज, नांदूर-मधमेश्‍वर, रामकृष्ण उपसा सिंचन योजना, वैजापूर एमआयडीसीचा प्रलंबित प्रश्‍न धसास लावणे याला माझे प्राधान्य असणार आहे. 

मन्याडची उंची वाढवणे, हत्ती-घोडा साठवण तलावाचा तसेच विनायक सहकारी साखर कारखान्याचा प्रश्‍न सोडवण्याचे मोठे आव्हान माझ्या समोर आहे. आमदार म्हणून माझ्या कार्यकाळात ते सोडवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने हे प्रश्‍न सोडवण्यात मला निश्‍चितच यश येईल. 

(शब्दांकन : जगदीश पानसरे) 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com