After Brief Illness Shivendraraje attended Assembly Session
After Brief Illness Shivendraraje attended Assembly Session

हम फिट्ट है... म्हणत शिवेंद्रसिंहराजे पोहोचले विधानभवनात

उच्च रक्तदाबाच्या त्रासानंतर उपचार घेऊन अल्पशी विश्रांती घेतल्यावर तब्बल दहा दिवसानंतर हम फिट्ट है, म्हणत साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आज थेट विधानभवनात पोहोचले

सातारा : उच्च रक्तदाबाच्या त्रासानंतर उपचार घेऊन अल्पशी विश्रांती घेतल्यावर तब्बल दहा दिवसानंतर हम फिट्ट है, म्हणत साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आज थेट विधानभवनात पोहोचले. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशात ते सहभागी झाले. त्यामुळे सातारा व जावली तालुक्‍यातील त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

मागील आठवड्यात त्यांना अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास झाला. त्यामुळे त्यांना साताऱ्यातील खासगी रूग्णालयात उपचार करून त्यानंतर मुंबईत अधिक उपचारांसाठी हलविण्यात आले होते. मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये पाच दिवस उपचार व सर्व तपासण्या पूर्ण केल्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पण ते साताऱ्यात येण्याऐवजी मुंबईतील निवासस्थानी थांबले. येथे आणखी काही दिवस विश्रांतीसाठी थांबणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले होते. 

पण डिस्चार्ज मिळाल्यानंतर दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर आज (बुधवारी) ते हम फिट्ट है...म्हणत थेट विधानभवनात दाखल झाले. विधानसभेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातील विविध कामांना निधी मिळविण्यासाठी ते थेट विधानभवनात दाखल झाले. याबाबतचा फोटो सोशल मिडियाव व्हायरल झाल्यानंतर सातारा व जावलीतील त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना पाहण्यासाठी व त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांचे समर्थक व कार्यकर्ते यांनी मुंबई गाठली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com