बारामतीनंतर कुठे लढायची संधी मिळाली तर वर्ध्यातून लढेन : सुप्रिया सुळे 

supriya sule with clock
supriya sule with clock

वर्धा : वर्ध्यासोबत माझी नाळ जुळली आहे. बारामतीनंतर मला इतर कुठे लढायची संधी मिळाली तर मी वर्ध्यावरुन खासदारकी लढेन, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे केले. 

मुख्यध्यापकांच्या 59 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्‌घाटन सुळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. 

वर्ध्याला आले की मी आवर्जून पवनारच्या परमधाम आश्रमात जाते. तिथे मनाला शांती मिळते असेही त्या म्हणाल्या. खासदार तडस यांच्याकडे पाहत आपण चिंता करू नका, सध्याच तसा विचार नाही, असा खुलासा करताच सभागृहात हशा पिकला. 

मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या सारातून राज्यालाच नव्हे, तर देशाला दिशा देण्याचे काम करता येईल. तो सर्व मला किंवा खासदार तडस यांना पाठवला, तर मी संसदेत प्रश्‍न मांडण्याचे काम निश्‍चितच करेन. तसेच जुनी पेन्शन योजना, शालेय पोषण आहार, बदलीचा प्रश्न शाळेचे अनुदान या विषयांवर जयंत पाटील यांच्याशी चर्चा घडवून आणीन, असे आश्‍वासन खासदार सुळे यांनी काल येथे दिले. 

दत्ता मेघे ऑडिटोरियम मेडिकल कॉलेज, सावंगी येथे दोन दिवसीय मुख्याध्यापकांच्या राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. दीपप्रज्वलन करून शैक्षणिक संमेलनाची सुरुवात झाली. तत्पूर्वी, संमेलनाध्यक्ष दीपक डोंदल यांनी ध्वजारोहण केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com