युतीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच भाजपवर टीका करणारे नाशिक शिवसेना नेते भाजपच्या व्यासपीठावर

भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर कालपर्यंत भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी पहिल्यांदाच भाजपच्या जाहिर कार्यक्रमात व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांसह शिवसेनेच्या नेत्यांना गुलाबाचा सफारी हार घोलण्यात आला.
युतीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच भाजपवर टीका करणारे नाशिक शिवसेना नेते भाजपच्या व्यासपीठावर

नाशिक : भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर कालपर्यंत भाजपवर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांनी पहिल्यांदाच भाजपच्या जाहिर कार्यक्रमात व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांसह शिवसेनेच्या नेत्यांना गुलाबाचा सफारी हार घोलण्यात आला. दोन्ही नेते हास्य विनोदात रंगले. या हलक्‍या फुलक्‍या वातावरणात अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी 'दत्तक नाशिकच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. राज्याच्या तिजोरीचा कोडदेखील मी सांगेन', या शब्दांत नाशिककरांवर पुन्हा आश्‍वासनांचा वर्षाव केला.

अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते आमदार देवयानी फरांदे यांच्या मतदारसंघात विविध 45 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. या निमित्ताने झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. ते म्हणाले की, आमदार फरांदे यांच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झाली. विविध कामांसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने निधी उपलब्ध करून दिला. अंदाजपत्रकात नाशिकला आर्थिक निधीचा मोठा वाटा दिला जाणार आहे. अर्थमंत्री या नात्याने त्याचा साक्षीदार म्हणून मी काम करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. पाच लाख रुपयांचे सुरक्षा विमाकवच, आरोग्य सुरक्षाकवच, मुद्रा योजना, स्टॅंड अप, 2022 पर्यंत प्रत्येकाला घरे आदी केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख त्यांनी केला.

या वेळी आमदार बाळासाहेब सानप, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, महापालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, विजय साने, महापालिका सभागृह नेते संभाजी मोरुस्कर, प्रा. सुहास फरांदे, सतीश कुलकर्णी, आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com